आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Britain Queen Run America, American Citizens Write Letter

ब्रिटनच्या महाराणींनीच थेट अमेरिकेचा गाडा हाकावा! अमेरिकन नागरिकांचा महाराणींना पत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राणी - Divya Marathi
राणी
लंडन - अमेरिकेतील एक नागरिक राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या स्पर्धेत सहभागी उमेदवारांवर नाराज आहे. याच कारणामुळे त्याने ब्रिटिश महाराणी एलिझाबेथ आणि पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांना पत्र पाठवून आपली व्यथा मांडली आहे. सगळ्यात मजेदार बाब म्हणजे यामध्ये त्याने अमेरिकेला युनायटेड किंगडमच्या नियंत्रणाखाली आणण्याची इच्छा व्यक्त केली आहे. संपूर्ण पत्रात या बाबीचा सहा वेळेस उल्लेख करण्यात आला आहे.

पत्रात त्याने लिहिले की, डोनाल्ड ट्रंपने या स्पर्धेतून त्वरित माघार घेणे आवश्यक आहे आणि देशाचे नियंत्रण आपल्या हातात घेणे आवश्यक आहे. नो-सोय-डे- एस्कोसिया नावाच्या युजरने अमेरिकी नागरिकांच्या वतीने हे पत्र लिहिले आहे. एका रेडिट युजरने म्हटले की, अँग्लोफाइल(ब्रिटनचा समर्थक) मित्र अमेरिकी नेत्यांवर खूप नाराज आहे. त्यामुळे त्याने बर्मिंगहॅम पॅलेसला पत्र लिहिले आहे.

आमचे नेतृत्व करण्याची इच्छा बाळगणारा त्या पदालायक नाही, असे पत्रात नमूद आहे. तुम्ही नुकतीच झालेली रिपब्लिकन पार्टीची प्राथमिक चर्चा पाहा. यात अशा प्रकारचे निवेदन करण्याची वेळ का आली असेल, हे आपणास कळेल. राणी एलिझाबेथ अद्याप आपल्यात आहेत हे सुदैव आहे. रिपब्लिकन पक्षाच्या ११ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्या वेळी पत्र पाठवण्यात आले आहे.
पुढे वाचा.. महाराणी एलिझाबेथ यांच्या कार्यालयाकडून पाठवण्यात आलेले पत्र...