आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Britain's Emili Go 2 Thousand 280 Days In School

ब्रिटनच्या एमिलीचा सलग २ हजार २८० दिवस शाळेत जाण्याचा विक्रम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एमिली प्लाट, विद्यार्थिनी - Divya Marathi
एमिली प्लाट, विद्यार्थिनी
लंडन - मुलांना शाळेत जायला सर्वसाधारणपणे कंटाळा येतो. दररोज कोणते ना कोणते कारण पुढे केले जाते. आज आजारी आहे. आज गृहपाठ पूर्ण झाला नाही. आज मन लागत नाही, असे नानाविध कारणे शाळा बुडवण्यासाठी दिली जातात. मात्र, यामध्ये एक किशोरवयीन मुलगी अशीही आहे, जिने १२ वर्षांत एक दिवसही शाळा बुडवली नाही. तिच्या या यशामुळे शाळेने नुकतेच तिला बक्षीस दिले आहे. विशेष म्हणजे आजारी असतानाही तिने कधी शाळा बुडवली नाही.

एमिली प्लाट - वय १६ वर्षे
एमिली प्लाट ब्रिटनच्या काही निवडक विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये समाविष्ट आहे, ज्यांनी एक दिवसही शाळा बुडवलेली नाही. ती गेल्या १२ वर्षांपासून सुटी वगळता दररोज शाळेत जाते. त्यामुळे सलग २ हजार २८० दिवस शाळेत जाण्याचा तिने विक्रम केला आहे. एमिलीने नुकतीच "जनरल सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन'ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यामुळे तिने आता माध्यमिक शाळेला अलविदा केला आहे.
हे काही विशेष नाही. मी नियमित शाळेत जाणे इन्जॉय करते. दररोज सकाळी उठून शाळेत जाते. मी जोपर्यंत शिकेन तोपर्यंत असाच नियम राहील. कधी-कधी अंथरुणावरून उठावे वाटत नाही. मात्र, शाळेत गेल्यानंतर झोप उडून जाते.- एमिली प्लाट, विद्यार्थिनी

पुढे वाचा... हेही कमी नाहीत