आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनच्या अति लठ्ठ व्यक्तिचे निधन, डॉक्टरांच्या इशा-याकडे केले दुर्लक्ष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ब्रिटनचा सर्वात लठ्ठ व्यक्ति कार्ल थॉम्पसनचे केंट येथील राहत्या घरी शनिवारी(ता.20) निधन झाले. कार्ल हा अवघ्‍या 33 वर्षांचा होता. निधनाची वार्ता समजल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले होते. त्यांच्या माहितीनुसार, कार्लचा मृत्यू संशयस्पद नाही.
मेंदूच्या आजाराने 2012 मध्‍ये झालेल्या आईच्या मृत्यूमुळे कार्लच्या वजनात भरच पडत गेली. वजन कमी केले नाहीतर, तुला जगाचा निरोप घ्‍यावा लागेल, असे डॉक्टरांनी त्याला बजावले होते. त्याच्या समोर असलेले कोणतेही खाद्यपदार्थ तो खाऊन टाकायचा. तो घराबाहेर निघायचा नाही.