आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनच्या रोल्स राॅयसला 38,600 कोटी रुपयांचा विक्रमी तोटा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ब्रिटिश कंपनी रोल्स रॉयसला वर्ष २०१६ मध्ये ३८,६०० कोटी रुपयांचा विक्रमी तोटा झाला आहे. ब्रेक्झिटनंतर पौंडच्या मूल्यात झालेल्या घसरणीमुळे सुमारे ३७,००० कोटींचे नुकसान झाले. दुसरीकडे भ्रष्टाचाराचे एक प्रकरण मिटवण्यासाठी कंपनीला अमेरिका, ब्राझील आणि इंग्लंडमधील नियंत्रकांना ५,६०० कोटी रुपये देणे आहे. कंपनीला ही रक्कम पाच वर्षांत फेडायची आहे. मात्र कंपनीने २०१६ मध्येच ही सर्व रक्कम खात्यात भरली. नुकसानी मागे ही दोन प्रमुखे कारणे सांगितली जातात. विशेष म्हणजे कंपनीला २०१५ मध्ये ७,०० कोटी रुपयांचा नफा झाला होता.

इंजिन बनवणारी अव्वल कंपनी म्हणून रोल्स रॉयसची ख्याती आहे. एअरबस आणि बोइंग या दोन बड्या विमान कंपन्या या इंजिनाचा वापर करतात. जहाजांसाठी पॉवर सिस्टिमची निर्मितीही कंपनी करते. अलीकडील काळात विमान आणि जहाजांची विक्री घटल्याने कंपनीच्या इंजिनाची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे सीईओ वॉरेन ईस्ट खर्च कपातीवर जास्त भर देत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय करणाऱ्या कंपन्या चलनाच्या मूल्यातील चढ-उतारापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात करन्सी हेजिंग करतात.
 
सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास यालाच विमा असेही म्हणता येईल. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची हलाखीची स्थिती लक्षात घेऊन आगामी काळात डॉलर स्वस्त होईल आणि पौंडचे मूल्य वधारेल, अशी कंपनी व्यवस्थापनाला अपेक्षा होती. मात्र घडले याच्या उलटे. जून २०१६ मध्ये ब्रिटनने युरो झोनमधून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर डॉलरच्या तुलनेत पौंड २० टक्क्यांनी स्वस्त झाला आहे. यामुळे झालेला तोटा आतबट्ट्याच्या खात्यात 
टाकावा लागला.
 
६.६ लाख कोटींचा सर्वाधिक तोटा 
अमेरिकेची एओएल टाईम वॉर्नर यांना २०१२ मध्ये ९८.७ अब्ज डॉलरचा तोटा झाला होता. सध्याच्या मूल्यानुसार तो आता ६.६ लाख कोटी रुपयांवर पोहोचला. हा जागतिक काॅर्पोरेट इतिहासातील सर्वाधिक वार्षिक तोटा नोंदवला गेला आहे. 
 
कंपनी समभाग ३ टक्क्यांनी घटले
डिसेंबर महिन्यामध्ये कंपनीने २.५ लाख कोटी रुपयांचे करेन्सी हेजिंग केले होते. तेव्हा यांचे बाजार भांडवल केवळ १.१ लाख कोटी रुपये आहे. मंगळवारी तोटा झाल्याचे वृत्त आल्यानंतर कंपनीचे समभाग ३ टक्क्यांनी अधिक प्रमाणात घसरले.
बातम्या आणखी आहेत...