आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • British Airways Passengers, Crew Escape Blazing Plane In Las Vegas

पेटलेल्या विमानातील १७२ प्रवाशांना अवघ्‍या ३ मिनिटांत वाचवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विमानाच्या डाव्या इंजिनाला आग लागली. - Divya Marathi
विमानाच्या डाव्या इंजिनाला आग लागली.
ह्यस्टन - अमेरिकेतून लंडनला जाण्यासाठी टेक ऑफची तयारी करणाऱ्या ब्रिटिश एअरवेजच्या विमानाने अचानक पेट घेतला. पाहता पाहता धूर आणि आगीच्या लोळांनी विमानाच्या डाव्या बाजूला घेरले होते. परंतु सुदैवाने १७२ जण सुखरूप बचावले आहेत. तेही केवळ तीन मिनिटांत....
लास वेगासमधील मॅकरान आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
विमानात १५९ प्रवासी आणि १३ कर्मचारी होते. उड्डाणाची तयारी सुरू होती. मात्र, अचानक विमानाच्या डाव्या भागात स्फोटाचा आवाज होऊन आग लागल्याने िवमान पेटले. विमानात धूरच धूर झाला होता. ही आग सुरुवातीला विमानाच्या एका पंख्याखालून लागली. आणीबाणीची स्थिती आेळखून व्यवस्थापनाने तत्काळ प्रवाशांना बाहेर काढण्याची माेहीम हाती घेतली. प्रवाशांनीही प्रसंगावधान राखून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. विमानात काळा धूर झाला. त्यामुळे काही क्षणात श्वासोच्छ्वास घेणेही कठीण जात होते. परंतु विमानातून बाहेर काढण्याचे प्रयत्न वाढवण्यात आल्यामुळे प्रवाशांना जीव वाचवणे शक्य झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले. त्यात दोन प्रवासी मात्र जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
डाव्या इंजिनाकडून दगाफटका
विमानाच्या डाव्या इंजिनाला आग लागली. ती भडकल्यानंतर काही वेळातच विमानाचा एक भाग पूर्णपणे आगीने लपेटला होता, असे प्राथमिक तपासातून दिसून आल्याचे केंद्रीय विमान प्रशासनाचे प्रवक्ते इयान ग्रेगर यांनी सांगितले.
नवव्या क्रमांकाचे विमानतळ
लास वेगासमधील दुर्घटना झालेले विमानतळ अमेरिकेतील सर्वाधिक वर्दळ असलेले ९ व्या क्रमांकाचे विमानतळ आहे. गेल्या वर्षी सुमारे ४ कोटी प्रवाशांनी या विमानतळावरून प्रवास केला होता. युरोप, आशियाकडे याच विमानतळावरून मोठी वाहतूक होते.

दोन मिनिटांत घटनास्थळी
दुर्घटनेनंतर बचाव पथकाची कारवाई महत्त्वाची ठरली. अग्निशमन दलाच्या जवानांना आगीची माहिती मिळताच त्यांचे पथक दोन मिनिटानंतर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ बचाव कार्य हाती घेतले.

मोहीम फत्ते
एखाद्या हॉलीवूडपटात शोभावे असे दृश्य लास वेगासमध्ये प्रवाशांनी पाहिले. सुपरमॅनने पापणी लवताच संकटातून अलगदपणे उचलून सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याची किमया करावी, असा काहीसा अनुभव प्रवाशांना आला असावा. कारण घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी केवळ काही मिनिटांत सर्वच्या सर्व प्रवाशांना पेटलेल्या विमानातून सुखरूपपणे बाहेर काढले.
पुढील स्‍लाइडवर पाहा संबंधित फोटोज...