लॉस वेगास- अमेरिकेतील लॉस वेगासमध्ये टेकऑफ करताना एका विमानाला अचानक आग लागली. मॅकक्रॅन इंटरनॅशनल एअरपोर्टवर सर्व प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.
विमानात 159 प्रवाशी आणि 13 क्रू मेंबर्स होते. त्यापैकी तिघे किरकोळ भाजल्याची माहिती मिळाली आहे. ब्रिटिश एअरवेजचे हे विमान लॉस वेगासहून लंडनला जात होते.
टेक ऑफ करताना विमानाच्या डाव्या बाजुला असलेल्या इंजिनला आग लागली. या घटनेमुळे एअरपोर्ट अथॉरिटीने काही काळासाठी विमानसेवा थांबवण्यात आली आहे. सर्व प्रवाशी सुखरुप असल्याचे फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन पॅसेफिक डिव्हिजनचे अध्यक्ष इयान ग्रेगोर यांनी सांगितले आहे.
पुढील स्लाइडवर पाहा फोटो दुर्घटनाग्रस्त विमानाचे फोटो...