आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • British Health Service Has Three Years Without Publicity

ब्रिटिश आरोग्यसेवेत तीन वर्षांपासून बिनबोभाटपणे केली नोकरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- व्यापमंसारख्या प्रकरणामुळे घोटाळे भारतातच होतात, असे आपल्याला वाटते. परंतु कायद्याची कडक अंमलबजावणी होणाऱ्या ब्रिटनसारख्या देशात बोगस डॉक्टर आढळून आल्यास? तेदेखील सरकारी आरोग्य खात्यामध्ये..

आता बोला!
येथे एका सरकारी बोगस डॉक्टरला अटक करण्यात आली. नोंदणीकृत डॉक्टरांपेक्षा पकडलेल्या डॉक्टरचे मेडिकल रेकॉर्ड अधिक चांगले आहे. साडेतीन वर्षांच्या काळात या महाशयांनी सातहून अधिक सरकारी रुग्णालयांत उपचार केले आहेत. सर्दी, डोकेदुखीशिवाय कर्करोग, हृदयरोग, शस्त्रक्रिया आणि अवयव प्रत्यारोपणासारख्या विभागातदेखील महाशयांनी सहजपणे काम करून दाखवले. ३६ वर्षांच्या या डॉक्टरांचे नाव लिवॉन मिखितारियन. लिवॉन हे जॉर्जियाचे रहिवासी आहेत. लिवॉन याने वैद्यकीय शिक्षण घेतले आहे, परंतु त्याला डॉक्टरांसारखे काम करण्याची परवानगी नव्हती. तो केवळ प्रशिक्षणार्थींप्रमाणे प्राथमिक उपचार करू शकत होता.
सरकारी आरोग्य केंद्रात काम करता लिवॉनने वरिष्ठ डॉक्टरांचे आयडी चोरले. त्यानंतर तो वेगवेगळ्या शहरातील आरोग्य केंद्रांत विविध डॉक्टरांच्या नावाने प्रॅक्टिस करू लागला. सर्वात पहिल्यांदा त्याने २०१३ मध्ये लंडनपासून ६५ किमी अंतरावरील केंट भागात सरकारी रुग्णालयात डॉक्टर म्हणून नोकरी केली. तेथे तो पकडला गेला. त्यानंतर त्याने बाेगसगिरी करून बँक स्टेटमेंट, स्वत: केलेल्या शस्त्रक्रियांची माहिती तयार केली. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या मेडिकल सेंटरवरदेखील महाशयांनी सेवा दिली.

परंतु एप्रिलमध्ये एक सिक्युरिटी पास घेताना त्याच्या नशिबाने त्याची साथ सोडली. तो नोकरीच्या निमित्ताने केंटच्या एका अन्य रुग्णालयात गेला होता. येथील सिक्युरिटी पास घेण्यासाठी त्याने सांगितलेले नाव ऐकताच सुरक्षा यंत्रणा एकदम दक्ष झाली. कारण त्या नावाच्या डॉक्टरांच्या नावे अगोदरच सिक्युरिटी पास जारी झालेला होता.

आपला भंडाफोड झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने स्वत:ची आेळख इटलीचा नागरिक अशी सांगितली. माझे वडील याच रुग्णालयात दाखल असल्याचेही खोटे सांगितले. म्हणूनच त्याच डॉक्टरांचे नाव आपण घेतले, असे तो सांगू लागला. त्यानंतर रुग्णालयातील कागदपत्रे तपासण्यात आली. तेथे त्याचे वडील नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर हा बोगस डॉक्टर असल्याचे उघड झाले. एनएचएस अनेक दिवसांपासून याच बोगस माणसाचा शोध घेत होते. अखेर त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली.