आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोशल मीडियावर ISISला संपर्क करण्याच्या आरोपात ब्रिटीश ग्लॅमर मॉडेलला अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन: दहशतवादी संघटना ISIS ला संपर्क केल्याच्या आरोपाखाली ब्रिटिश ग्लॅमर मॉडल किम्बरले मिनर्सला अटक करण्यात आले आहे. मिनर्सवर बऱ्याच दिवसांपासून पोलिस आणि गुप्तचर यंत्रणा एमआय-5 लक्ष ठेवून होती. ब्रिटीश माध्यमांनुसार मिनर्सला ब्रिटीश एजंसीने वॉच लिस्टमध्ये ठेवले होते. काय आहे प्रकरण...
- ब्रिटिश वृत्तपत्र ‘द सन’ आणि ‘संडे टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार मिनर्सला शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली आहे. या दरम्यान त्यांची चौकशी करण्यात आली.
- मिळालेल्या माहितीनुसार, किम्बरलेने काही महिन्यापूर्वी इस्लाम धर्म स्वीकारला होता. यानंतर ती ISIS च्या दहशतवाद्यांच्या संपर्कात आली. मिनर्स सोशल मेडियावरून दहशतवादी संघटनेशी संबंधीत लोकांशी बोलत होती.
- ब्रिटनच्या अँटी टेरर पोलिस आणि सीक्रेट सर्व्हिस यांच्यावर ती लक्ष ठेवत होती. तीला पोलिसांनी अनेक वेळा ISIS शी संपर्कावरून वॉर्निंग दिली होती.
घराची घेतली तलाशी
- पोलिसांनी मिनर्सच्या अटकेदरम्यान तिच्या घराची बारकाईने तपासणी केली. मात्र या तपासणी दरम्यान पोलिसांना काय मिळाले याची माहिती देण्यात आली नाही.
- मिनर्सला शनिवारी जामिनावर सोडण्यात आले आहे. मात्र तीला काही अटी मान्य कराव्या लागतील.
- मिळालेल्या माहितीनुसार, मागिल महिन्यात मिनर्सने सोशल मेडियावर स्वतःला आयशा लॉरेन अल-ब्रिटानिया नावाने सादर केले होते. मिनर्सने स्वतःचे बुरख्यातील फोटोसुध्दा शेअर केले होते. याशिवाय तिने अशा काही महिलांचे फोटो पोस्ट केले होते, ज्यामध्ये त्या महिलांनी दहशतवाद्यांप्रमाणे हातात रायफल अथवा इतर हत्यार घेतल्या होत्या.
बातम्या आणखी आहेत...