आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • British PM David Cameron Seen In Relax Mood During Summer Vacations

इंग्लंडचे पंतप्रधान पहिल्यांदा दिसले रिलॅक्स मुडमध्ये, समर ब्रेकचे फोटो व्हायरल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्लंडचे पंतप्रधान म्हटले की सुटाबुटातला चेहरा डोळ्यांसमोर येतो. भारतात सुटबुट आणला तो इंग्रजांनीच. इंग्लंडच्या प्रशासनाकडून पंतप्रधानांची इमेज जपण्याचा खुप प्रयत्न केला जातो. त्यामुळे पदावर असताना त्यांचे कायम सुटाबुटातील फोटो जाहीर केले जातात. रिलॅक्स मुडमधील फोटो कधीच समोर येत नाहीत. पण पहिल्यांदाच डेव्हिड कॅमरुन यांचे पत्नीसोबतचे रिलॅक्स मुडचे फोटो जाहीर झाले आहेत.
डेव्हिड कॅमरुन पत्नी समंथा यांच्यासोबत पोर्तुगालमधील अलव्होर येथे उन्हाळ्याच्या सुट्या घालवण्यासाठी गेले आहेत. रिलॅक्स मुडमधील अगदी हातात बिअरचे पेग असलेले त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. यात कॅमरुन फिटफ्लॉप कर्व्ह सोलचे शुज घालून दिसतात. वजन कमी करण्यासाठी आणि मसल्स घडवण्यासाठी या शुजचा वापर केला जातो. कॅमरुन सध्या वाढत्या वयामुळे त्रस्त असल्याचे या शुजवरुन दिसून येते.
लंडनमधील कंपनीने 2007 मध्ये हे शुज लॉंच केले होते. तेव्हापासून सुमारे 50 डॉलरला मिळणारे हे शुज फॅशन सिम्बॉल झाले आहेत. इंग्लंडमधील निवडणुकांच्या वेळी डेव्हिड कॅमरुन यांनी सांगितले होते, की मला आता वजन कमी करायचे आहे. माझ्या डायटमधून मी ब्रेड हा पदार्थ वगळला आहे. तसेच दररोज जॉगिंगला जात आहे.
पुढील स्लाईडवर बघा, डेव्हिड कॅमरुन यांचे रिलॅक्स मुडमधील आणखी फोटो... पत्नीसह गेले आहेत उन्हाळ्याच्या सुटीवर...