आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीरप्रश्नी कोणाच्याही बाजूने नाही; ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांचे स्पष्टीकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रश्न आहे, त्यांनाच तो सोडवायचा आहे. आपण त्यात दखल देणार नाही. आपण सहा ते आठ नोव्हेंबरदरम्यान भारताच्या दौऱ्यावर जात आहोत, त्या वेळी आपले लक्ष फक्त द्विपक्षीय मुद्द्यांवरच केंद्रित राहील, असे प्रतिपादन ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी केले आहे.

ब्रिटनच्या प्रतिनिधी सभागृहात त्या म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी होणाऱ्या चर्चेत काश्मीरचा मुद्दा उपस्थित होण्याची कुठलीही शक्यता नाही.

‘भारत दौऱ्यावर जाण्याआधी पंतप्रधान माझ्याशी तसेच इतर पक्षांच्या नेत्यांशी काश्मीरमधील मानवाधिकारांचे उल्लंघन आणि आत्मनिर्णयाच्या मुद्द्यावर चर्चा करणार का? त्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त राष्ट्रांच्या १९४८ च्या प्रस्तावावर चर्चा करतील का,’ असा प्रश्न पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या संसद सदस्य यास्मिन कुरेशी यांनी पंतप्रधान थेरेसा मे यांना विचारला होता. त्याला उत्तर देताना थेरेसा म्हणाल्या की, ‘या मुद्द्यावर आपण कोणाशीही चर्चा करणार नाही. परराष्ट्रमंत्री बोरिस जॉन्सन यांनी सर्वांचे म्हणणे ऐकले आहे. ते तुमच्याशी चर्चा करतील.’ यास्मिन या वायव्य बोल्टनच्या संसद सदस्य आहेत.
बातम्या आणखी आहेत...