आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ISIS शी संबंध ठेवल्याचे ब्रिटिश मॉडलला अटक, दहशतवाद्याशी करणार होती लग्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- ब्रिटनची बोल्ड अॅण्ड ब्युटिफुल 27 वर्षीय मॉडेल किम्बरले मायनर्स हिला पोलिसांनी इस्लामिक स्टेटशी (ISIS) संबंध ठेवल्याच्या आरोपांवरुन अटक केली आहे. जेहादी व्हिडिओचा प्रचार केल्याचाही तिच्यावर आरोप आहे.
ब्रिटिश पोलिसांनी दहशतवाद विरोधी कायदा 2000 अंतर्गत किम्बरलेला अटक केली आहे. दहशतवाद्यांपासून दूर राहा असे तिला पोलिसांनी अनेकदा सांगितले होते. पण तिने काहीएक ऐकले नाही. अखेर पोलिसांनी तिला अटक केली.
अटक केल्यानंतर पोलिसांनी तिच्या घरावर छापा टाकला आहे. यावेळी काही आक्षेपार्ह साहित्य सापडले. पोलिसांना बुरख्यात असलेल्या एका तरुणीचा फोटो सापडला आहे. त्याच्यावर आयशा लॉरेन अल ब्रितानिया असे लिहिले आहे. हा फोटो तिचाच असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
किम्बरलेने इस्लाम स्वीकारला असून आयएसआयच्या संपर्कात असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. पण अद्याप यासंदर्भात कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. तिने फेसबुकच्या माध्यमातून आयएसआय कमांडरशीही संवाद साधला होता. हा कमांडर या दहशतवादी संघटनांसाठी महिलांची भरती करतो.
किम्बरलेला एका दहशतवाद्याची बायको करण्याचा कट आयएसआयने रचल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. जगभरात आपल्या कारवायांसाठी प्रसिद्ध असलेल्या या संघटनेचा हा पब्लिसिटी स्टंट आहे. गेल्या वर्षीय इस्लामी समारंभात किम्बरले सामिल झाली होती. त्यावेळी ती या धर्माकडे आकर्षित झाल्याचे तिने कबुल केले आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा सुपरमॉडेल किम्बरलेचे ग्लॅमरस फोटो.....
बातम्या आणखी आहेत...