आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RAW अधिकाऱ्यांनी युरोपात पाकिस्तानी पक्षाच्या नेत्यांची घेतली अनेकदा भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या दस्तऐवजावरुन एमक्यूएम आणि रॉ अधिकाऱ्यांची भेट झाल्याचा दावा ब्रिटीश मीडियाने केला - Divya Marathi
या दस्तऐवजावरुन एमक्यूएम आणि रॉ अधिकाऱ्यांची भेट झाल्याचा दावा ब्रिटीश मीडियाने केला
लंडन - भारताची गुप्तचर संस्था 'रॉ'च्या अधिकाऱ्यांनी 90 च्या दशकात पाकिस्तानचा राजकीय पक्ष मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट (एमक्यूएम) च्या नेत्यांसोबत अनेक मिटिंग केल्याचा दावा ब्रिटनच्या एका मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. एमक्यूएमचे लंडनमधील कार्यकर्ते तारिक मीर यांनी ब्रिटीश पोलिसांना या संदर्भातील माहिती दिली आहे. मीर यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनूसार, '1990मध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते रॉ अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. त्यांच्यात अनेक बैठका झाल्या.' ब्रिटीश पोलिसांच्या दस्तऐवजांच्या आधारे द संडे एक्स्प्रेस शो ने हा दावा केला आहे.

याआधीच्या मीडिया रिपोर्टमध्ये भारताने कराचीमध्ये अशांतता पसरवण्यासाठी एमक्यूएमला पैसे आणि प्रशिक्षण दिल्याचा आरोप करण्यात आला होता. या वृत्ताच्या आधारे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी एमक्यूएमच्या चौकशीचे आदेश दिले होते. पाकिस्तान सरकार याआधीही भारत एमक्यूएमला मदत करत असल्याचा आरोप करत आले आहे.
काय आहे प्रकरण
तारिक मीरने भारतीय गुप्तचर संस्थेचे अधिकारी आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटल्याचे 30 मे 2012 मध्ये अॅडवेअरच्या एका पोलिस स्टेशनमध्ये सांगितले होते. त्याचा उल्लेख पोलिसांच्या दस्तऐवजात करण्यात आला आहे. ब्रिटीश अधिकाऱ्यांनी एमक्यूएमच्या नेत्यांद्वारा केलेल्या कथित मनी लॉन्ड्रींग प्रकरणात मीरची चौकशी केली होती. 2010 मध्ये पक्षाच्या नेत्याच्या हत्येनंतर एमक्यूएमच्या चौकशीचे आदेश दिले होते. ब्रिटीश अधिकाऱ्यांना एमक्यूएमच्या लंडन ऑफिसमध्ये आणि पक्षाचे नेते अल्ताफ हुसैन यांच्या घरी पाच लाख पौंड सापडले होते.
बातम्या आणखी आहेत...