आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा यांच्या खुनाचा कट उधळला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन- ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या खुनाचा कट इस्लामिक कट्टरवाद्यांनी रचला होता. मात्र केंद्रीय सुरक्षा यंत्रणेने याचे धागेदोरे वेळीच शोधल्याने हा कट उधळून लावला आहे. या कटाशी संबंधित दोन व्यक्तींना अटक करण्यात आल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी प्रकाशित केले. महानगर पोलिसांनी नाईमूर झाकारीयाह रहमान (२०) याला उत्तर लंडनमधून आणि मुहंमद अकीब इम्रान (२१) याला बर्मिंगहॅम येथून अटक केली.   ब्रिटनच्या दहशतवादविरोधी विभाग (एमआय ५) आणि पोलिसांनी संयुक्तरीत्या राबवलेल्या मोहिमेअंतर्गत या दोन व्यक्तींना अटक केले असल्याचे वृत्तात म्हटले आहे. गेल्या आठवड्यात ही मोहीम यशस्वी झाली. दरम्यान, स्कॉटलंड यार्डच्या प्रवक्त्याने अटक केलेल्या दोघांची आेळख सांगण्यास नकार दिला असून थेरेसा मे यांच्या खुनाच्या कटाशी त्यांचा संबंध असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे.  


डाउनिंग स्ट्रीट येथील निवासस्थानच्या प्रवेशद्वारावर बॉम्बस्फोट घडवून आणणे व नंतर थेरेसा यांच्यावर चाकूने हल्ला करण्याची त्यांची योजना होती. लंडन आणि बर्मिंगहॅम येथे सुरक्षा यंत्रणेने धाडसत्र हाती घेतले होते. त्यामध्ये २ व्यक्तींना अटक करण्यात आले. वेस्टमिनिस्टर जिल्हा न्यायालयासमोर त्यांना हजर केले जाईल. मार्च २०१७ नंतर इस्लामिक कट्टरवाद्यांचा ९ वा कट उधळून लावण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले आहे.  


मे यांच्यावर हल्ला करण्याच्या कटासंबंधी एमआय ५ चे प्रमुख अँड्रयू पार्कर यांनी मंगळवारी कॅबिनेटला तपशील दिला. 

बातम्या आणखी आहेत...