आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • British Salvage Boat Recovers Treasure From Wreck Of Ss City Of Cairo

1942 मध्ये बु़डाले होते मुंबईहून निघालेले जहाज, 70 वर्षांनंतर सापडले 316 कोटी रुपयांची नाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - 1942 साली मुंबईहून लंडनसाठी निघालेले ब्रिटीश जहाज 'एसएस सिटी काहिरा'ला शोधून काढण्यात ब्रिटीश क्रू टीमला यश आले आहे. या जहाजात शेकडो टन चांदीची नाणी सापडली आहेत. लंडनमधील टेलिग्राफ दैनिकातील वृत्तानुसार, या चांदीच्या नाण्यांची किंमत 50 मिलियन डॉलर (जवळपास 316 कोटी रुपये) आहे.
एसएस सिटी काहिरा हे जहाज अर्धे कार्गो आणि अर्धे प्रवासी जहाज होते. या जहाजाला दुसर्‍या महायुद्धात सहा नोव्हेंबर 1942 रोजी जर्मन पाणबुडी यू-68 ने बुडवले होते. या जहाजावरील 104 प्रवाशांच्या मृत्यूसह चांदीची नाणी समुद्राच्या तळाशी गेली होती. ही नाणी ब्रिटीश सरकराच्या खजिन्यात जमा करायचे होते.
डीप ओशन सर्च नावाने एक टीम या जहाजाचा शोध घेत होती. त्यासाठी त्यांनी समुद्राचा विक्रमी तळ (5150 मीटर) गाठला होता. 2011 मध्ये या सर्च ऑपरेशनला सुरुवात झाली होती. या जहाजाचा मलबा सापडल्याने त्याचा शोध सुरु करण्यात आला होता. खराब हवामान आणि खोल समुद्रात शोध सुरु असल्यामुळे या जहाजाला शोधण्यास अनेक वर्षे लागली. शेवटी जहाजाचा शोध लागला, गाळात फसलेल्या या जहाजावर चांदीच्या नाण्यांनी भरलेल्या पेट्या सापडल्या.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, एसएस सिटी काहिरावर सापडलेले 50 मिलियन डॉलर चांदी