आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अश्लील बोलणार नाही, दुखावणार नाही..., मुलांकडून लिहून घेत आहे ब्रिटनमधील शाळा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ब्रिटनमधील एका सरकारी प्राथमिक शाळेत एक आगळाच नियम लावण्यात अाला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना आता आपण अश्लील भाषा वापरणार नाही, असे चक्क लेखी द्यावे लागेल. याशिवाय वंशभेद होईल असे शब्द वापरणार नाही, एखाद्याच्या जीवनशैलीबद्दल बोलणार नाही, असेही लिहून द्यावे लागणार आहे. विशेष म्हणजे तीन वर्षे वयाच्या मुलांकडूनही हे लिहून घेतले जात अाहे. यामुळे पालक वर्गात संताप पसरला आहे.

शिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, "होम स्कूल अॅग्रीमेंट' म्हणून लिहून द्यावयाच्या या हमीवर विद्यार्थ्यांना स्वाक्षरीही करावी लागणार आहे. शाळेतून ही सूचना मिळताच पालक मात्र जाम भडकले आहेत. त्यांनी शाळेबाहेर चक्क निदर्शने केली. हे प्रकरण चिघळल्यानंतर सरकारी अधिकाऱ्याने याबद्दल माफी मागितली आणि प्रकरण मिटले. शालेय स्तरावरच मुलांमध्ये नैतिकदृष्ट्या शिस्त लागावी म्हणून हा उपाय करण्यात आला होता.