आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • British Woman Paralyzed In Crash Defies Doctors To Walk Again Becomes A Model

डॉक्टर हरले; मात्र आईच्या प्रोत्साहनामुळे ती उभी राहिली, बनली \'ब्युटी क्वीन\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून हॉस्पिटलमध्‍ये अतिदक्षता विभागात जीवनाशी संघर्ष करताना सारा आणि बरी झाल्यानंतरचे तिचे उजवीकडील छायाचित्रे - Divya Marathi
डावीकडून हॉस्पिटलमध्‍ये अतिदक्षता विभागात जीवनाशी संघर्ष करताना सारा आणि बरी झाल्यानंतरचे तिचे उजवीकडील छायाचित्रे
लंडन - ती कार अपघातात गंभीर जखमी झाली होती. डोक्याला मुका मार लागल्याने तिला अर्धांगवायू झाला. मात्र तिने हिंमत सोडली नाही. ही कहाणी आहे सारा नजमची. आज ती एक यशस्वी मॉडल बनली आहे. सारा मिस युनायटेड ब्रिटिश ब्युटी पेजेंट स्पर्धेची उपविजेती आहे. ती सध्‍या लँकशायरमध्‍ये फेब्रूवारी महिन्यात होणा-या मिस एलिगेंट नॉर्थ स्पर्धेची तयारी करत आहे.

जेव्हा साराची आई तिची हिंमत बनली तेव्हा आजाराला पळवले...
2012 मध्‍ये कार अपघातात सारा गंभीर झाली होती. डॉक्टरांनी ती बरी होईल ही अशाच सोडली होती. जरी ती बरी झाली तरी कधी चालू शकणार नाही. तेव्हा सारा 17 वर्षांची होती. मात्र साराने हिंमत सोडली नाही. ती संघर्ष करत राहिली. महाविद्यालयात तिचे सर्व खिल्ली उडवत असल्याने तिने घरातच अभ्‍यास सुरु केला. लोक तिला चिडवत होते. मात्र साराची आई पाम तिच्यापेक्षा हिंमतवाली होती. त्यांनी तिला अस्त्र टाकू दिले नाही. आई पूर्णवेळ तिचे मनोधैर्य वाढवत असे. यामुळे ती पुन्हा उभी राहू शकली.
अपघातानंतर पहिले छायाचित्र काढले
2014 मध्‍ये आईने साराला बर्मिंगहॅममध्‍ये एका मॉडलिंग फोटोशूटमध्‍ये जायला तयार केले. जेव्हा लंडनमधील एका प्रसिध्‍द संस्थेने तिला नोकरीचा प्रस्ताव दिला तेव्हा तिला स्वत:वर विश्‍वास बसला नव्हता. हळूहळू सारा जहिरातीत दिसू लागली आणि एका आंतरराष्‍ट्रीय पातळीवरील मासिकाच्या मुखपृष्‍ठावर तिचे छायाचित्र छापले होते. तिच्या यशाचा प्रवास सुरु झाला होता. मागील वर्षी ऑक्टोबरमध्‍ये झालेल्या मिस युनायटेड ब्रिटिश पेजेंटमध्ये ती उपविजेती ठरली आहे.
आई नेहमी प्रोत्साहन द्यायची
साराने सांगितले, की अपघातानंतर बिछान्यावर पडून असल्याने वाईट स्वप्न पडायची. मात्र आई नेहमी मला प्रोत्साहन द्यायची. अपघातानंतरही तू पूर्वी इतकीच सुंदर दिसते, असा आत्मविश्‍वास आईने मला मिळवून दिला, असे ती म्हणते. ही आईची इच्छा होती, की मी पुन्हा एकदा उभे राहून स्वत:ची वेगळी ओळख बनवावी. मला जेव्हा पहिल्यांदा जहिरातीसाठी निवडले गेले तेव्हा आम्ही मायलेकी खूप रडलो. मात्र मी आनंदी होते. मला जगण्‍याची एक नवी आशा मिळाली. या नंतर मी कधीच मागे वळून पाहिले नाही.
स्वप्नांना जिवंत ठेवले - सारा
माझा प्रवास लांब आणि संकटांनी वेढलेला होता. मी पुन्हा एकदा आपल्या पायावर उभी राहू शकले. सगळ्यांना मी चुकीचे सिध्‍द केले. कारण त्यांनी माझ्या क्षमतेवर प्रश्‍न उपस्थित केले होते. सर्वांना अशा अवस्थेतून जावे लागते. मात्र मी त्यांना सांगू इच्छिते, की हिंमत सोडू नका, आपले स्वप्न जिवंत ठेवा.
पुढील स्लाइड्सवर पाहा साराची काही छायाचित्रे...