आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सार्वजनिक झाली प्रिन्सची पत्रे!, पत्रांवरील स्थगिती ठरवली बेकायदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स यांनी दहा वर्षांपूर्वी विविध विभागांना पाठवलेल्या गुप्त पत्रांना बुधवारी जाहीर करण्यात आले. अनेक वृत्तपत्रांनी ब्लॅक स्पायडर मेमोज नावाने ही पत्रे प्रकाशित केली असून प्रिन्स चार्ल्स यांनी सामाजिक मुद्यांचे गांभीर्य या पत्रातून मांडले होते.

चार्ल्स यांनी लष्कर, डेअरी क्षेत्रातील कामगारांच्या समस्यांना वाचा फोडली होती. यासोबतच ब्रिटिश सरकार आणि ‘द गार्डियन’ यांच्यात गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन लढाईचा शेवट झाला आहे. चार्ल्स यांनी २००४-०५ दरम्यान सात मंत्र्यांना २७ पत्रे लिहिली होती. त्या वेळी टोनी ब्लेअर पंतप्रधान होते. या पत्रांद्वारे त्यांनी सरकारच्या अनेक धोरणांवर प्रभाव टाकण्याचाही प्रयत्न केला होता. ‘द गार्डियन’ने या पत्रांना प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी अॅटर्नी जनरल ग्रीव्हने त्यावर निर्बंध घातले. त्या आदेशाला गार्डियनने न्यायालयात आव्हान दिले होते.
ही पत्रे सार्वजनिक झाल्यानंतर प्रिन्स चार्ल्स यांची प्रतिष्ठा धुळीस मिळू शकते, असा दावा ब्रिटनच्या सरकारने केला होता; परंतु गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या निर्णयाला बेकायदा ठरवले होते.