आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: सोन्याच्या विमानात फ‍िरतो ब्रुनेईचा सुलतान, स्वत:चे आहे बोइंग जेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: सुलतान यांच्या गोल्ड प्लेटेड विमानाचे अंतर्गत दृश्‍य
कधीकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तिंमध्‍ये गणना झालेल्या ब्रुनेईचा सुलतान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्यांनी आपला छोटा मुलगा प्रिन्स अब्दुल मलिकची राजेशाही विवाहाचे रिसेप्शन रविवारी आलीशान नुरुल इमान पॅलेसमध्‍ये आयोजित केले होते. विशेष म्हणजे पॅलेस ग्रँड गोल्ड प्लेटने सजावण्‍यात आले होते.
सुलतान हसनल यांचा समावेश जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तिंमध्‍ये होतो.कारण आहे तेलविहिरी. 1980च्या शेवटी सुलतानला प्रथमच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तिंच्या यादीत समावेश झाला. मात्र 1990 मध्‍ये अमेरिकन उद्योगपती बिल गेट्स यांनी हा बहुमान त्यांच्याकडून हिसकावून घेतला. सुलतान यांची एकूण संपत्ती 1.24 करोड रुपये आहे. ते नेहमी सोन्याचे विमान आणि कार घेऊनच बाहेर पडतात. या व्यतिरिक्त त्यांच्या गॅरेजमध्‍ये सात हजार कार उभ्या आहेत. सुलतान यांचा जन्म 15 जुलै, 1946 मध्‍ये ब्रुनेई टाऊन झाला. त्यांचे परदेशात शिक्षण झाले आहे. आयलँड ऑफ बोरनियोतील ब्रुनेई एक छोटासा देश आहे.
वैयक्तिक आयुष्‍य
सुलतान हसनल बोलकियाला तीन पत्नी आहेत. पहिली पत्नी सध्‍या त्यांच्याबरोबर राहत असून बाकीच्या दोघींनी घटस्फोट घेतला आहे.
गाड्यांचे चाहते
त्यांना महागड्या कारचे संग्रह करायला आवडते.फरारी वॅगनाजेशन्स, एस्टन मार्टिन आणि बेंटलेसह अनेक आरामदायी कार त्यांच्याकडे आहेत. बेंटले ही सुलतानांची सर्वात आवडती लक्झरीयस कार आहे. त्यांच्या गॅरीजची लांबी-रुंछी पाच विमानाच्या हँगरप्रमाणे आहे. सुलतान यांच्याकडे 7 हजार अशी सुंदर गाड्या आहेत. यात 600 मर्सिडीज कार आहेत. अंदाजे यांची किंमत 5 अब्ज डॉलरपेक्षा जास्त असण्‍याची शक्यता आहे. तसेच त्यांच्याकडे एक गोल्ड प्लेटेड कारही आहे.

स्वत:चे बोइंग विमान
सुलतान यांच्याकडे स्वत:चे बोइंग 747-400 विमान आहे. ते एका महालापेक्षा कमी नाही. विमानाच्या आत एक लिव्हिंग रुम, बेड रुम आणि खूप सोन आहे. हे जेट पूर्णपणे अ‍ाधुनिक उपकरणांनी सज्ज असून एक रिमोट कंट्रोल डेस्कही आहे. त्यांच्या जवळ बोइंग 767-200 हे विमानही आहे. त्याची निर्मिती बोइंग कमर्शियल एअरप्लॅन्सने केली आहे. या व्यतिरिक्त एक एअरबस ए 340-200 या विमानाचा समावेश आहे. यात 261 प्रवाशी बसू शकतात.

पुढील स्लाइड्स पाहा, सुलतानचे गोल्ड प्लेटेड विमान आणि पॅलेसचे फोटोज...