आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ब्रुसेल्स : व्यवसायात नुकसान होणार, तरीही कार-फ्री झोनला प्रोत्साहन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रुसेल्स : प्रदूषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी युरोपातील अनेक देशांतील शहर आपला मोठा भाग कार-फ्री करत आहेत आणि लोकांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत. ब्रुसेल्सने १५ वर्षांपूर्वी अशी मोहीम हाती घेऊन मोठा भाग कार-फ्री केला होता.
एप्रिल २०१७ मध्ये हे पाऊल आणखी मोठ्या स्वरूपात सादर केले जाईल. त्यानुसार अर्ध्यापेक्षा जास्त शहर कार-फ्री झोनमध्ये रूपांतरित होईल. जेंट शहराने १९९७ ला शहराच्या मध्यातील मोठा भाग कार-फ्री केला होता. तत्कालीन महापौर फ्रेन्क बेक यांना त्यासाठी मोठा विरोधही पत्करावा लागला होता. त्यांच्यावर हल्लाही झाला होता. नंतर लोकांचे मत घेण्यात आले तेव्हा ७२ टक्क्यांनी कार-फ्री झोनचे समर्थन केले होते.
बातम्या आणखी आहेत...