आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Brutal Deaths: असे दिले जायचे मृत्यूदंड, की मृत्यूलाही कापरे फुटायचे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरात जेव्हा राजेशाही होती तेव्हा अत्यंत क्रूर अशा शिक्षा दिल्या जायच्या. राजद्रोह केला असेल तर अत्यंत हिंसक पद्धतीने मृत्युदंडाची शिक्षा बजावली जायची. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जायचा. गुन्हेगाराला जास्तीत जास्त वेदनादायी मृत्यू देण्याकडे यावेळी कल असायचा. युरोपात तर गुन्हेगाराला शिक्षा होताना बघणे जणू एक प्रकारची करमणूक होती. अगदी स्टेट इव्हेंटसारखी ती आयोजित केली जायची. लोक मुद्दाम अशा ठिकाणी उपस्थित राहायचे. भारतातही मृत्यूदंडाच्या वेगवेगळ्या शिक्षा दिल्या जायच्या. या शिक्षा ऐकून अंगावर अगदी काटा उभा राहतो. मृत्यूलाही कापरे भरते.
ऐशू ख्रिस्तांचे करण्यात आले तसे क्रुसिफिकेशन, माणसाला मारण्यासाठी उंदराला वापर, महिला गुन्हेगार असेल तर वन्यप्राण्यांकडून बलात्कार करवून ठार मारणे, कातडी सोलून ठार मारणे, किल्ल्यावरुन कडेलोट करणे, हत्तीच्या पायाखाली देणे, उकळत्या तेलात किंवा पाण्यात टाकणे आदी शिक्षा यावेळी दिल्या जायच्या. शिक्षा झालेला गुन्हेगार अगदी नरक यातना सहन करीत जीव सोडायचा. प्राणांतिक वेदनेने तडफत त्याचा जीव जायचा.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा, एका पेक्षा एक क्रूर शिक्षा... अंगावर उभा राहिला काटा....