आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुल रायडिंगवर हॉलीवूडच्या कंपनीचा डाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यातील एका रात्री स्टीलच्या पिंजऱ्यामध्ये बंद ७०० किलोपेक्षा अधिक वजनी बैल सनशाइन रागाने डाफरत आहे. आपली शिंगे तो दरवाजावर जोरात आदळत आहे. रिंगमध्ये उतरण्यासाठी तो बेचैन आहे. दरवाजा उघडतो.

सनशाइन जोशात रिंगमध्ये घुसतो. तो उसळ्या मारत असतो. त्याच्या पाठीवर बसलेल्या ८० किलो वजनाचा काऊ बॉय त्याच्यावरील पकड कायम ठेवण्यासाठी जिवानिशी प्रयत्न करत असतो. डग्लस डंकनला गुण मिळवण्यासाठी फक्त आठ सेकंद काढणे गरजेचे आहे. मात्र, सनशाइन कुठे ऐकणार. त्याने तीनच सेकंदात डंकनला जमिनीवर आपटले आणि रिंगमध्ये उन्मादाने विजयी दौड लावली.

गर्दी एकच जल्लोष करते. हे दृश्य अमेरिकेतील कुठल्याही मोठ्या शहराचे नाही, तर फिलाडेल्फियापासून जवळपास ८० किमी दूर एलनटाउन, पासाडेनामधील हॉकीच्या मैदानातील आहे. व्यावसायिक बूल रायडर्स (पीबीआर) बिल्ट फोर्ड टफ सीरिज अंतर्गत झालेला सामना पाहण्यासाठी काऊबाॅइज हॅट घातलेले मॅकेनिक, महिला आणि व्यावसायिकही उपस्थित होते. एलनटाउनमध्ये जमा झालेल्या गर्दीच्या कारणानेच हॉलीवूडच्या सर्वात प्रतिष्ठित कंपनीने नुकतेच पैसे लावले. ओप्रा विनफ्रे, बेन एफलेकसारख्या नामी तारकांनी मार्केटिंग करणाऱ्या स्पोर्ट्स एंटरटेन्मेंट कंपनी डब्ल्यूएमई/आईएमजीने एप्रिलमध्ये एक इक्विटी फर्मकडून पीबीआरची ७७५ कोटींना खरेदी केली.

ग्रामीण अमेरिकेच्या मनोरंजनासाठी सुरू झालेला बुल रायडिंग हा खेळ ग्लोबल मीडिया खेळ बनला आहे. पीबीआर आ अमेरिकेच्या न्यूयॉर्क, शिकागो, सिएटलसारख्या शहरांत व ऑस्ट्रेलिया, ब्राझील, मेक्सिकोपर्यंत सामने आयोजित करत आहे. २१ ऑक्टोबरला लास वेगासमध्ये जागतिक अंतिम स्पर्धा होईल. पाच दिवसांचा हा खेळ सीबीएस स्पोर्ट्सवर थेट प्रक्षेपित होईल. डब्ल्यूएमई/आईएमजीचा हा शो चीनला घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे. १५ एप्रिल १९९२ रोजी व्यावसायिक रोडियो काऊबॉय असोसिएशन टूरच्या काही असंतुष्ट बूल रायडर्सने असोसिएशनमधून वेगळे निघत संयुक्त बुल रायडिंगला सुरुवात केली. २१ असंतुष्ट रायडर्सने एक-एक हजार डॉलर लावले. १९९४मध्ये त्यांना प्रायोजक मिळाले. नेशविले नेटवर्कने पुढील वर्षी प्रसारण सुरू केले. पीबीआर अाता खूप पुढे गेली आहे. यंदा फोर्डने ८४ कोटी रुपयांचा करार केला. टॉप रायडरने ४० कोटींचे बक्षीस जिंकले. त्यात कमरेवर कॉर्पोरेट लोगो लावण्यासाठीचेही पैसे अंतर्भूत आहे. न्यूयॉर्कचा सामना मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये होतो. सीबीएस चॅनल टूर प्रक्षेपित करते.