आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Burger King Wedding Looks Like A Whopper Of A Good Time: Pictures, Details!

इंटरनेटवर व्हायरल: आडनाव बर्गर-किंग, बर्गर किंगने लावले लग्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॅक्सनव्हिले (अमेरिका)- होएल आणि अॅश्ले या कोणत्याही क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती नाहीत. मात्र, दोघांच्या आडनावांनी त्यांना इतरांपेक्षा खास ओळख दिली आहे. याच कारणामुळे जगातील तिसरी सर्वात मोठी फास्टफूडची चेन बर्गर किंगने त्यांचे लग्न प्रायोजित केले.

दोघे अमेरिकेच्या इलिनॉय प्रांताच्या जॅक्सनव्हिलेत राहतात. होएलचे पूर्ण नाव होएल बर्गर आहे. तसेच अॅश्लेचे पूर्ण नाव अॅश्ले किंग आहे. दोघेही लहानपणापासून मित्र आहेत. शाळेपासून ते कॉलेजपर्यंत प्रत्येक जण त्यांना बर्गर-किंग नावाने संबोधत होता. अॅश्ले म्हणते, तुझा बर्गर कुठे गेला, असे म्हणून लोक चिडवायचेही. एप्रिलमध्ये या जोडीने लग्नाचा निर्णय घेत साखरपुडाही उरकला. त्याची घोषणा करण्यासाठी गंमत म्हणून बर्गर किंग रेस्तराँच्या बाहेर एक फोटोही काढला. तो फेसबुकवर पोस्ट केला. मग ‘झालं एकदाचं, बर्गर- किंग एकमेकांचे बनले’, अशा कॉमेंट्सचा सिलसिला सुरू झाला. ही पाेस्ट बर्गर -किंग वेडिंग नावाने व्हायरल होत कंपनीपर्यत पोहोचली.

होएल म्हणाला, लग्नाची नोंदणी केली त्याच दिवशी फ्लोरिडातून एक कॉल आला. समोरील व्यक्ती बर्गर किंग कंपनीची प्रतिनिधी होती. त्याने लग्नाचा संपूर्ण खर्च उचलण्याची ऑफर दिली. तुम्ही असे का करू इच्छिता या माझ्या प्रश्नावर तो म्हणाला की, साखरपुड्याचा फोटो पुन्हा एकदा निरखून पाहा. मी फोटो पाहिल्यानंतर लक्षात आले की, आमची आडनावे जोडली तर त्यातून कंपनीचे नाव तयार होते.

कंपनीचे प्रतिनिधी एरिक हिरशॉर्न म्हणाले, आम्हाला जेव्हा बर्गर -किंग जोडीची माहिती मिळाली तेव्हा वाटले की त्यांचे लग्न सेलिब्रेट करायलाच हवे. अशी आडनावे असलेल्या जोड्यांचा विवाह होणे दुर्मिळच आहे. तसेच एखाद्या फास्टफूड चेनने लग्नच स्पॉन्सर करावे, असेही पहिल्यांदाच घडले आहे. कंपनी इतर खर्चांसह होएल-अॅश्ले यांच्या व्यतिरिक्त लग्नात आलेल्या सर्व पाहुण्यांचे कपडे आणि भेटवस्तूंचाही खर्च उचलला.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो...