आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Burglary Suspect Has Breakdown When Judge Recognize Him As Former Playmate

जज म्‍हणाल्‍या, आपण शाळेतले मित्र, तेव्‍हा आरोपीला कोसळलं रडू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यायाधिशांनी चोराला ओळखले तो तर ढसाढसा रडत होता. - Divya Marathi
न्यायाधिशांनी चोराला ओळखले तो तर ढसाढसा रडत होता.

मयामी (अमेरिका) - चोरीच्‍या आरोपात पकडण्‍यात आलेल्‍या आर्थर बुथ नामक आरोपीला अमेरिकेतील मयामीच्‍या एका कोर्टात उभे करण्‍यात आले. खटल्‍याची सुनावणी करणा-या महिला न्‍यायाधीश मिंडी ग्लेजर यांनी त्‍याला ओळखले नि सांगितले, आपण एकाच शाळेत होतो. शेवटी जजने त्‍याला जामीन देताच त्‍याला हसू की, रडू असे झाले होते. तुम्‍ही मिडल स्‍कुलमध्‍ये शिकत होता काय ? असे ग्‍लेजर यांनी विचारले. तेव्‍हा बुथ यांनी न्‍यायाधीशांना ओळखण्‍याचा प्रयत्‍न केला. ओळख पटताच तो हसू लागला. मात्र, नंतर खाली मान करून तो ढसाढसा रडू लागला.


आरोपी बुथला जज ‘सर' म्‍हणाल्या
महिला न्‍यायाधीश ग्लेजर म्‍हणाल्‍या, ‘सर तुम्‍ही कुठे आहात याबाबत मी नेहमी विचार करत होती. आता तुम्‍ही गुन्‍हेगार असल्‍याचे मला दु:ख वाटते'. नंतर त्‍यांनी न्‍यायालयालाही सांगितले की, मिडल स्‍कुलमध्‍ये हे चांगले विद्यार्थी होते आणि मी त्‍यांच्‍यासोबत फुटबॉल खेळत होती. ग्‍लेजर यांनी बुथला त्‍याच्‍या पुढील जीवनासाठी शुभेच्‍छा दिल्‍या व त्‍याच्‍या परिस्थितीत बदल होईल अशी आशा व्‍यक्‍त केली. 27.7948 लाख रूपयांच्‍या जामीन दस्‍ताऐवजानुसार त्‍यांनी जामीन मंजूर केला.

ड्रग्‍समुळे बुथ गुन्‍हेगार
बुथची चुलत बहीण मेलिसा मिलरने सांगितले, ‘तिचा भाऊ अभ्‍यासाबरोबर खेळातही तरबेज होता. परंतु, ड्रग्‍समुळे त्‍याच्‍या जीवनाचे नुकसान झाले आहे. यामुळेच तो गुन्‍हेगारही बनला आहे. बुथ आणि जज ग्‍लेजर यांची भेट झाल्‍याने आपला भाऊ चांगल्‍या वाटेवर येईल,’ अशी अपेक्षाही मिलरने व्‍यक्‍त केली.