आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

31 वर्षांपूर्वी 80 लोक आले होते, आता 70 हजार लोकांचा वाळवंटी मेळा; अमेरिकेत बर्निंग मॅन फेस्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रेना - अमेरिकेतील नेवादा प्रांतात ब्लॅक रॉक नावाचा वाळवंटी प्रदेश आहे. येथे ३१ व्या बर्निंग मॅन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  वाळवंटी प्रदेशातील हा सर्वात मोठा महोत्सव आहे.शहरात ७० हजारांवर लोक दाखल झाले आहेत. त्यासाठी एक शहर वसवले जाते. त्यात गीत-नृत्याचे प्रदर्शन केले जाते. सोमवारी अखेरच्या दिवशी हे शहर जाळून टाकले जाईल. त्यासोबत आपला अहंकारही जळून जातो, असे महोत्सवामागील तत्त्वज्ञान आहे.
 

- लोकांना स्वातंत्र्याचा अर्थ लक्षात यावा म्हणून  कोणतेही नियम लागू नाहीत.  
- शहरात इंधनावरील वाहनाला पूर्णपणे बंदी, सायकल किंवा पायी चालण्याची परवानगी.  
 
 
वालुका वादळात ४० अंश तापमान  
पहिल्यांदा १९८६ मध्ये हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता तेव्हा केवळ ८० लोक पोहोचले होते. लॅरी हार्वने तो सुरू केला होता. लोकांनी स्वत:साठी वेळ काढावा हा त्यामागील उद्देश होता. त्यामुळे वाळवंटासारख्या भागातही लोक आनंदी राहतात. आपल्या मनासारखे जीवन जगू शकतात.  
 

पर्यावरणाची हानी होऊ नये हाच नियम  
या शहरात इंधनाच्या वाहनाला बंदी आहे. केवळ सायकल चालवता येते. पर्यावरणाची हानी होऊ नये हाच एक नियम आहे. तेथे एक कलात्मक वाहन आहे. मात्र नियम तोडल्यास शहर सोडावे लागते. शिबिरासाठी हीच एकमेव अट आहे. बाकी काहीही नियम नाही.  
 
 
 
बातम्या आणखी आहेत...