इंटरनॅशनल डेस्क - दक्षिण अफ्रिकेत राहणारे भारतीय वंशाचे उद्योजक रिजवान आडतिया आपल्या सामाजिक कार्यांसाठी ओळखले जातात. त्यांच्या सामाजिक सेवेचे वैशिष्ट्य असे आहे, की ते दरवर्षी वृद्धाश्रमाला जाऊन तेथील 50 वृद्धांना निवडून परदेश वारीवर घेऊन जातात. विशेष म्हणजे, ते वृद्धांच्या फॉरेन टूरमध्ये सहकुटुंब सहभागी होतात. सध्या ते 50 वृद्धांसोबत सिंगापूर दौऱ्यावर आहेत. क्रूझने ते या सर्वांना मलेशियात घेऊन जात आहेत.
यासाठी वृद्धांना घेऊन जातात रिजवान
- बिजनेसमन रिजवान यांचे कुटुंब मुळात गुजरातच्या पोरबंदर येथील रहिवासी आहे. ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी फॉरेन टूरवर घेऊन जाण्यामागे एक इमोशनल कारण आहे.
- रिजवान यांच्या कुटुंबात तीन भावांसह आई-वडील सुद्धा होते. 10 वर्षांपूर्वी ते गुजरात सोडून अफ्रिकेत स्थायिक झाले. याच ठिकाणी त्यांनी आपला व्यापार वाढवला.
- या दरम्यान त्यांचे इतर भाऊ दुसऱ्या देशांमध्ये जाऊन वसले. रिजवान यांचे आई-वडील रिजवान यांच्यासोबतच राहण्यास इच्छुक होते.
- सुरुवातील बिजनेस चालत नसल्याने त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे, ते आपल्या आई-वडिलांना आपल्यासोबत अफ्रिकेत आणू शकले नाहीत. आई-वडील आजारी असतानाही ते त्यांची सेवा करू शकले नाहीत.
- दोन वर्षांपूर्वीच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले. या दुःख आणि पालकांना आणू शकलो नाही, या खंतमुळे रिजवान खचून गेले.
- तरीही कसे-बसे स्वतःला सावरले आणि ज्येष्ठ नागरिकांची सेवा करून त्यांना दरवर्षी परदेश दौऱ्यांवर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला.
- रिजवान यांच्या आई-वडिलांचे निधन सप्टेंबरमध्ये झाले होते. त्यामुळेच, ते दरवर्षी सप्टेंबर महिन्यात 50 ज्येष्ठ नागरिकांना फॉरेन टूरवर घेऊन जातात.
वृद्धाश्रमातून घेऊन येतात ज्येष्ठ नागरिक
- रिजवान आडतिया याच नावाने त्यांची एक संघटना आहे. ही संघटना समाज सेवेसाठी अफ्रिकेसह भारतातही प्रसिद्ध आहे.
- याच संघटनेच्या माध्यमातून वृद्धाश्रमात जाऊन दरवर्षी 50 ज्येष्ठांची निवड केली जाते. फॉरेन टूर दरम्यान त्यांच्या तिकीटापासून जेवणासह सर्वस्वी खर्च रिजवान स्वतः उचलतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा, रिजवान यांच्या फॉरेन टूरचे आणखी काही फोटोज...