आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Caesarean Should Only Be Performed When Medically Necessary: WHO

"गरज असेल तरच करावी सिझेरियन प्रसूती'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिनेव्हा - जगभरात एखाद्या साथीसारखी "सिझेरियन' तंत्राद्वारे प्रसूती करण्याची पद्धत पसरत आहे. अशी बाळंतपणे आई व बाळासाठी घातक ठरू शकतात. यामुळे वैद्यकीयदृष्ट्या अत्यंत गरज असेल तेव्हाच सिझेरियन करावे, असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेने (हू) दिला आहे.

"हू'च्या प्रजनन आरोग्य विभागाच्या संचालक व स्त्रीरोगतज्ज्ञ मार्लिन टेम्मरमॅन म्हणाल्या, विकसित व विकसनशील देशांत गरज नसताना सिझेरियन प्रसूतीचा कल वाढला आहे. ही पद्धत सुरक्षित असली तरी ती शस्त्रक्रियाच आहे. त्यामुळे आई व बाळावर दुष्परिणाम होऊ शकतात. सिझेरियनमुळे अतीव रक्तस्राव व इतर गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

भारतात मोठ्या प्रमाणात वाढ
भारतात २००८ मध्ये सिझेरियन प्रसूतींचे प्रमाण ८.१ टक्के होते. काही खासगी संस्थांनुसार, केरळात सिझेरियन प्रसूतीदर तामिळनाडूत ५८, तर केरळात ४१ टक्क्यांवर पोहोचला आहे. हरियाणात २००७ ते २०१२ दरम्यान सिझेरियनचे प्रमाण ३१ वरून ५१ टक्क्यांवर पोहोचल्याचे आढळले आहे.

कारण काय?
टेम्मरमॅननुसार, डॉक्टरांनी गर्भावस्थेचे केलेले "मेडिकलायझेशन' हे सिझेरियन वाढीचे प्रमुख कारण आहे. डॉक्टरांकडून औषधे व इतर वैद्यकीय उपायांचा वापर होतो. सामान्य परिस्थितीत प्रसूती नर्सेस व प्रशिक्षित सुईणींकडून करावी. अर्थात गुंतागुंत असेल तर डॉक्टरांकरवी प्रसूती करण्याशिवाय पर्याय नाही.

आर्थिक लाभासाठी?
आर्थिक फायद्यासाठी डॉक्टर व रुग्णालये शस्त्रक्रियेचा आग्रह धरतात, याबद्दल खात्री नसल्याचे टेम्मरमॅन म्हणाल्या. अनेक देशांत डॉक्टरांना दोन्ही प्रसूतींसाठी बहुधा सारखीच रक्कम मिळते. ४० वर्षांपूर्वीच्या तुलनेत ही प्रसूती अधिक सुरक्षित झाली आहे. शस्त्रक्रियेपेक्षा आता महिलांना सामान्य प्रसूतीतील वेदनांची भीती वाटते.

१० ते १५ टक्के दर सामान्य
टेम्मरमॅन म्हणाल्या, "हू'कडून १० ते १५ टक्के सिझेरियन प्रसूती दर असलेल्या देशांना सामान्य समजले जाते. सध्या सर्वच देशांत सिझेरियन प्रसूतींचे प्रमाण वाढले आहे. त्याचा आई व बाळावर नकारात्मक परिणाम दिसला आहे.