आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेडिसन स्क्वेअरप्रमाणे कॅलिफोर्नियातही घुमणार, ‘मोदी-मोदी’ च्या घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या वर्षी न्यूयॉर्कच्या मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये मोदींच्या कार्यक्रमासाठी अशी गर्दी जमली होती. - Divya Marathi
गेल्या वर्षी न्यूयॉर्कच्या मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये मोदींच्या कार्यक्रमासाठी अशी गर्दी जमली होती.
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या कॅलिफोर्नियाध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीयांच्या शानदार स्वागताची तयारी सुरू आहे. सान जोस येथील सॅप सेंटरमध्ये 27 सप्टेंबरला ‘मोदी-मोदी’च्या घोषणा ऐकायला मिळतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबरमध्ये संयुक्त राष्ट्राच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी अमेरिकेला जाणार आहेत. त्याचदरम्यान ते सिलिकॉन व्हॅलीला जातील.

जवाहरलाल नेहरुंनंतर कॅलिफोर्नियाला जाणारे मोदी हे दुसरे भारतीय पंतप्रधान असतील. सिलिकॉन व्हॅलीमध्ये स्वागताच्या तयारीसंदर्भात भारतीय-अमेरिकन संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये कॅलिफोर्नियाच्या सनीवेलमध्ये बैठक घेण्यात आली. यात अमेरिकेतील भारतीय राजदूत अरुण के. सिंह यांनी व्हिडियो कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले. तसेच भारताचे महावाणिज्यदूत व्यंकटेश अशोक आणि भाजपच्या परराष्ट्र संबंध विभागाचे प्रभारी डॉ. विजय चौथाईवाला हेही सहभागी झाले होते.

भाषण ऐकण्यासाठी 20 हजारावर गर्दी होण्याची शक्यता
नव्याने स्थापन जालेल्या ‘इंडो-अमेरिकन कम्युनिटी ऑफ वेस्ट कोस्ट यूएसए’ चे खांडेराव कँड यांनी सांगितले की, सॅप सेंटरमध्ये पंतप्रधान मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी सुमारे 20,000 लोक येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. न्यूयॉर्कच्या मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्येही मोदींच्या कार्यक्रमासाठी अशीच गर्दी झाली होती. सिलिकॉन व्हॅली सॅन फ्रान्सिस्को बे एरियाचा भाग आहे. येथे भारतीय वंशाचे सुमारे पांच लाख लोक राहतात.

सॅप सेंटर..
न्यूयॉर्कच्या मेडिसन स्क्वेअर गार्डनप्रमाणेच सॅप सेंटर हे अशा कार्यक्रमांसाठी अमेरिकेतील एक महत्त्वाचे इनडोअर सभागृह आहे. त्याला शार्क टँकही म्हटले जाते. येथे 2006 मध्ये पाश्चिमात्य अमेरिकेत कार्यक्रमांची सर्वाधिक तिकिटे विकली गेली. गेल्यावर्षी पॉप सुपर स्टार मिली सायरसने तिच्या बँगेर्ज वर्ल्ड टूरदरम्यान याठिकाणी सादरीकरण केले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, मेडिसन स्क्वेअर गार्डनमधील मोदींच्या कार्यक्रमाचे PHOTOS
बातम्या आणखी आहेत...