आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीवर चार वर्षे अत्याचार करणाऱ्या पित्याला तब्बल 1503 वर्षांची शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रेस्नो- कॅलिफोर्नियाच्या फ्रेस्नोमध्ये एका व्यक्तीला चार वर्षांपर्यंत आपल्या मुलीवर अत्याचार केल्याच्या प्रकरणात दोषी ठरवून १५०३ वर्षे कैदेची शिक्षा सुनावण्यात आली.

देशातील ही सर्वाधिक कालावधीची शिक्षा आहे, असे मानले जात आहे. वडिलांचे हे घृणास्पद कृत्य मुलीनेच उघडकीस आणले. तिने सांगितले की, मी जेव्हा लहान होते तेव्हा कुटुंबाचा मित्र असलेल्या एका व्यक्तीने माझे लैंगिक शोषण केले होते. त्यानंतर ४१ वर्षीय पिता २००९ ते २०१३ या काळात आठवड्यात दोन ते तीन वेळा माझे लैंगिक शोषण करत होता. २३ वर्षांची झाल्यानंतर मी वडिलांना सोडण्याचा निर्णय घेतला. शिक्षा सुनावताना न्यायाधीश एडवर्ड सार्किसिया म्हणाले की, ही व्यक्ती समाजासाठी गंभीर धोका आहे. त्याला आपल्या कृत्याचा कुठलाही पश्चात्ताप झाला नाही. उलट त्यानेच मुलीवर आरोप केले.
बातम्या आणखी आहेत...