आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US हल्ल्यातील दोषी महिला भारतात आल्याच्या वृत्ताने खळबळ, पुरावे नाहीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वर्ष २०१३ मध्ये ताशफिन मलिक नामक महिला सौदी अरब मार्गे भारतात आल्याचा दावा स्थानिक माध्यमांनी केला आहे. - Divya Marathi
वर्ष २०१३ मध्ये ताशफिन मलिक नामक महिला सौदी अरब मार्गे भारतात आल्याचा दावा स्थानिक माध्यमांनी केला आहे.
न्यूयॉर्क - कॅलिफोर्नियातील गोळीबारात दोषी आढळलेली पाकिस्तानी महिला भारतातही गेली होती, असे वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिले आहे. वर्ष २०१३ मध्ये ताशफिन मलिक नामक महिला सौदी अरब मार्गे भारतात आल्याचा दावा स्थानिक माध्यमांनी केला आहे. त्यानंतर ती पतीसोबत अमेरिकेत आली. तिने सौदी अरबला दोनदा प्रवास केला आहे. सौदी अरब गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक माध्यमांनी हे वृत्त दिले.

सौदी गृहमंत्रालयाचे प्रवक्ते मन्सूर तुर्की यांनी ताशफिन जून २००८ मध्ये पाकिस्तानहून सौदीला आली होती असे सांगितले. येथे ती तिच्या वडिलांसोबत ९ आठवडे राहिली व पुन्हा पाकला परतली. त्यानंतर ८ जून २०१३ रोजी पाकिस्तानहून ती सौदीत आली. ६ ऑक्टोबर रोजी ती भारतात परतल्याचे मन्सूर यांनी सांगितले. मात्र ती भारतात किती दिवस होती, भारतात तिने प्रवेश केला होता वा नाही यासंबंधीचा तपशील अद्याप मिळाला नसल्याचे म्हटले आहे.
अमेरिकेला जाण्यापूर्वीच्या तिच्या आयुष्याचे तपशील सध्या तपासले जात आहेत. पाकिस्तानी अमेरिकन पती सइद रिझवान फारूक याच्यासह मिळून तिने बेछूट गोळीबार का केला हे गूढ अद्याप उलगडले नाही. गेल्या आठवड्यात यात १४ निरपराधांचा बळी गेला. तिचा पती तिला सौदीत भेटल्याचे कोणतेच पुरावे नसल्याचे मन्सूर यांनी सांगितले. मात्र ऑक्टोबर २०१३ मध्ये ते एकाच कालावधीत सौदीत होते. फारूक हज यात्रेसाठी येथे आली होती, असे त्यांनी सांगितले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, संबंधित फोटोज...