आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅमरून यांचा स्वबळावर सरकारचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा डेव्हीड कॅमरून यांचे सरकार स्थापन झाले आहे. फरक इतकाच आहे की, या वेळी ते दुसऱ्या कुठल्या पक्षाची मदत न घेता स्वबळावर सरकार स्थापन करणार आहेत. २३ वर्षानंतर प्रथमच कंझर्व्हेटीव्ह पक्ष स्वबळावर सरकारमध्ये आला आहे. दुसऱ्या टर्ममध्ये कुणाला मंत्री करायचे व कुणाला नाही यावर कॅमरून आठवडाअखेरीपर्यंत निर्णय घेतली. परंतु त्यांनी मागच्या सरकारमधील चार मंत्र्यांना न बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात अर्थमंत्री जॉज ओस्बोर्न, गृहमंत्री थेरेसा मे, परराष्ट्रमंत्री फिलिप हेमंड व संरक्षणमंत्री मायकल फॅलन. ओस्बार्न यांना उपपंतप्रधान म्हणूनही पदभार दिला जाईल, अशी शक्यता आहे.

कॅमरून यांनी स्कॉटलंडला जादा अधिकार देण्याच्या आश्वासन पूर्ण करणार असल्याचे म्हटले आहे. परंतु स्कॉटलंडमध्ये ५६ जागा जिंकणारे एसएनपीचे नेता निकलो स्टर्जन यांनी पंतप्रधान कॅमरॉन यांना सुखाने राज्य करू देणार नाही. स्कॉटलंडकडे त्यांना दुर्लक्ष करू देणार नाही. त्यांना निर्णय घ्यायला भाग पाडू असा इशारा दिला आहे.