आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Canadian Ex Model Tiger Sun Fighting In Syria With Kurd Fighters

ISIS शी 4 महिने लढल्यानंतर कॅनडाला परतली Ex-Model, शेअर केले अनुभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओटावा (कॅनडा) - कुख्यात दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांसोबत लढण्यासाठी सीरियात गेलेली कॅनडाची पूर्वाश्रमीची एक मॉडेल घरी परतली आहे. कॅनडातील सन व्हँकुवर येथील राहिवासी टायगर सन दहशतवाद्यांसोबत लढण्यासाठी कुर्दिश फायटर्सच्या पीपुल्स प्रोटेक्शन यूनिटसोबत चार महिने होती. एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत टायगरने युद्धाचे थरारक अनुभव शेअर केले. संधी मिळाली तर पुन्हा जाण्याची इच्छाही तिने व्यक्त केली.

का गेली लढायला
46 वर्षीय टायगर एका मुलीची आई आहे. तिचा जन्म जाम्बिया येथे झाला. लेबनानच्या एका व्यक्तीसोबत तिचे संबंध होते, परंतू अॅरेंज मॅरेज करण्यासाठी तो तिला सोडून गेला होता. सीरियाला जाण्याआधी तिने आयएसआयएसचा प्रचारकी व्हिडिओ पाहिला होता, त्यात ओटावाचा जिहादी मॅकगुरे दिसला होता. या व्हिडिओमुळेच टायगरला आयएसआयएसविरोधात लढण्याची प्रेरणा दिली होती. त्यानंतर टायगर दहशतवाद्यांशी लढण्यासाठी आपल्या एकुलत्या एका मुलीला सोडून एक मार्च रोजी सीरियात गेली होती. मॉडेल राहिलेल्या टायगरला शस्त्रास्त्र चालवण्याची काहीही माहिती नसताना लढण्याच्या आंतरिक बळावर तिने दहशतवाद्यांसोबत दोन हात केले.
थरारक अनुभव - कापलेल्या बोटावर पाय पडला, बाकीचे शरीर शोधूनही सापडले नाही
टायगरने दहशतवाद्यांसोबत झालेल्या लढाईचा आणि तेथील परिस्थितीचा थरराक अनुभव कथन केला. तिच्या डोळ्यांसमोर एका मुलाचा भु-सूरुगांच्या स्फोटात तडफडून मृत्यू झाला. कुर्द सैनिकांकडे त्याला वाचवण्यासाठी वैद्यकीय साधने तर नव्हतीच परंतू तसे प्रशिक्षण देखील त्यांना देण्यात आलेले नाही. तिने सांगितले, की पेट्रोलिंग करतान एका कापलेल्या बोटावर पाय पडला होता. त्यानंतर खूप शोधले तरी देखील मृत व्यक्तीचे बाकीचे शरीर त्यांना सापडले नाही. या मुलाखतीत टायगरने सांगितले, की मला रक्तपात आणि हिंसाचार पाहाण्याची आता सवय झाली आहे. आता मला मृतदेह देखील विचलित करु शकत नाहीत. मात्र, चार महिन्यांत जे माझे चांगले मित्र झाले आणि ज्यांना मी या युद्धात गमावले, त्यांना कधीही विसरु शकत नाही.

टायगरकडे दहशतवाद्यांना शोधण्याचे काम
जूनमध्ये टायगरच्या ग्रुपने सीरियाच्या उत्तरेकडील तल ऐब्यदवर कब्जा मिळविला होता. आयएसआयएस या शहराचा वापर काळ्या बाजारात तेल विक्रीसाठी करत होता. त्यासोबतच येथे तस्करीही मोठ्या प्रमाणात होत होती. युद्धा दरम्यान टायगरसोबत एक महिला फायटर होती. तिने 28 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. टायगरने मात्र चार महिन्यांच्या वास्तव्यात एकालाही मारले नाही. त्याबद्दल तिने सांगितले, की दहशतवादी माझ्या बंदूकीच्या गोळीपासून फार लांब अंतरावर राहात होते. माझ्यासोबत एक दुर्बीन होती. दुर्बीनीतून मी दहशतवाद्यांवर लक्ष ठेवून असायचे आणि त्यांच्या लोकशन्सची सहकाऱ्यांना माहिती देत राहायचे. युद्धा दरम्यान आमच्याजवळ मृतदेह पडलेले राहात होते. एकदा तर आम्ही अशा ठिकाणी लंच केला जिथे सडलेले मृतदेह पडलेले होते आणि काही मानवी कवट्या होत्या.
युद्धात सोबत असतात महिला आणि पुरुष
कुर्द सेनेमध्ये महिला आणि पुरुष फायटर्स एकत्र दहशतवाद्यांविरोधात लढतात, असा खुलासा टायगरने केला आहे. तिच्या म्हणण्यानूसार, त्यातील अनेकांमध्ये शारीरिक संबंध देखली असतात, पण बहुतेक जण ते उघड करत नाही. टायगरने सांगितले, की ती मॉडेल असतानाही सहकारी फायटर्सनी तिला समानतेची वागणूक दिली.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, टायगरचे फोटोज...