आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Canadian Filmmaker Rob Spence Replaces His Glass Eyeball With A Camera

सर्वसामान्यांपासून वेगळा, कॅनडाच्या चित्रपट निर्मात्याने डोळ्यात बसवला कॅमेरा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका डोळ्यात कॅमेरा बसवताना कॅनडाचा चित्रपट निर्माता रॉब स्पेन्स. - Divya Marathi
एका डोळ्यात कॅमेरा बसवताना कॅनडाचा चित्रपट निर्माता रॉब स्पेन्स.
कॅनडाचा चित्रपट निर्माता रॉब स्पेन्सला विज्ञानाने सर्वसामान्यांपासून वेगळे बनवले आहे. 43 वर्षांच्या रॉबने नुकतेच आपल्या एका डोळ्यात कॅमेरा बसवला आहे. ते इतर कॅमे-यांप्रमाणे कार्य करतो. मात्र त्यात एकदाच फक्त तीन मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड केला जाऊ शकतो.
त्याची वैशिष्‍ट्ये आणि कार्य
- नऊ वर्षांचा असताना पिस्तूल चालवताना झालेल्या एका अपघातात त्याचा एक डोळा निकामी झाला.
- आता 43 वय असलेल्या रॉबने निकामी डोळ्याचे बुबळ काढून त्या जागी कॅमेरा बसवण्‍याचा निर्णय घेतला.
- मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राध्‍यापक स्टीव मॅनने रोबॉटिक आयबॉल बनवण्‍यास त्यांची मदत केली आहे.
- या आयबॉल कॅमे-याची एक अडचण आहे. ते एकावेळी तीन मिनिटांपेक्षा जास्त वापर करता येत नाही.
- ओव्हरहिटींगमुळे तीन मिनिटांनंतर रॉबला हे सॉकेट बाहेर काढावे लागतील.
- कॅमेरा बिनतारी ट्रान्समीटरशी जोडलेले आहे. यामुळे व्हिडिओ संगणकात ट्रान्समीट होतो.
- हा कॅमेरा रॉबच्या मेंदूशी जोडला गेलेला नाही. ते प्रत्येक वस्तूची रेकॉर्ड करतो.
- टाइम्स मासिकाने त्यास 2009 च्या सर्वोत्कृष्‍ट संशोधनात सामील केले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा छायाचित्रे