आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशिकी 3 : परदेशी नवरदेवाने पंजाबी नवरीसाठी गायले \'तुम ही हो...\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओटावा - मेरीलँडच्या बाल्टीमोरमध्ये गेल्या महिन्यात एका लग्नात अनोखे दृश्य पाहायला मिळाले. फ्रँक ग्रिगोरी (36) नावाच्या या व्यक्तीने त्याच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये नवरीसाठी आशिकी 2 चित्रपटातील प्रसिद्ध गाणे 'तुम ही हो' गायले. ते ऐकूण नवरीसह सर्वच पाहुणे आवाक झाले. नवरीसह अनेक पाहुणेही त्याच्या या गाण्याचे भावूक झाले होते. फ्रँकने 27 जूनला पंजाबी वंशाच्या सिमरन मल्होत्रा (27) बरोबर विवाह केला.

हफिंग्टन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत सिमरनने सांगितले की, पतीला हिंदी गाणे म्हणताना पाहून धक्काच बसला. सिमरन म्हणाली, माझ्या डोक्यात फक्त एकच विचार सुरू होता की, फ्रँकने हे कसे केले. रिसेप्शनमध्ये असलेल्या सर्व उपस्थितांपैकी केवळ मला हे समजू शकते की, हे करण्यासाठी त्याला किती परिश्रम घ्यावे लागले असतील.

आधी वाचणार होता कविता
फ्रँक त्याच्या पत्नीसाठी आधी स्वतः लिहिलेली कविता म्हणणार होता. पण सिमरनच्या आईशी बोलल्यानंतर त्याने गाणे म्हणण्याचा विचार केला. पहिल्यांदाच जेव्हा मी या गाण्याचे शब्द वाचले तेव्हा माझ्या लक्षात आले की, माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी यापेक्षा चांगला मार्ग असूच शकत नाही, असे फ्रँक म्हणाला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, दोघांच्या लग्नाचे आणि गाणे ऐकून भावूक झालेल्या नवरीचे PHOTO
बातम्या आणखी आहेत...