आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Canadian Sikh Harjit Sajjan Named Canadas New Defense Minister

तालिबान्यांविरुद्ध लढाई लढलेले हरजीत सज्जन बनले कॅनडाचे डिफेन्स मिनिस्टर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ओटावा- भारतीय वंशाच्या चार पंजाबी व्यक्तींनी कॅनडात नवा इतिहास रचला आहे. कॅनडाच्या नव्या सरकारमध्ये चार भारतीय वंशाच्या पंजाबी मंत्र्यांचा समावेश करण्‍यात आला आहे.
कॅनडाच्या लष्करात असताना तालिबांन्यांविरुद्ध लढाई लढलेले शिख लेफ्टिनेंट कर्नल हरजीत सज्जन यांच्याकडे संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. कॅनडा सरकारमधील बंदिश चग्गर या सर्वात तरुण मंत्री ठरल्या आहेत. बंदिश या 34 वर्षांच्या आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टरुडो यांच्या 30 सदस्यीय कॅमिनेटमधील मंत्र्यांना एका कार्यक्रमात पद आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली.

भारतीय वंशाच्या व्यक्तींकडे कोणती जबाबदारी...
> चौथ्यांदा निवडून आलेले खासदार नवदीप बेंस यांच्याकडे विज्ञान व आर्थिक विकास मंत्रालयाची जबाबदारी.
> माजी मंत्री टिम उप्पल यांचा पराभव करणारे अमरजीत सोही यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर मिनिस्ट्रीची जबाबदारी. सोही कधीकाळी कारचालक होते. सोही यांना 1980 मध्ये भारतात दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षाही झाली होती.
> बंदिश चग्गर यांच्याकडे छोटे उद्योग व पर्यटन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. कॅनडाच्या सहा महिला खासदारांमध्ये मंत्रिपदाची माळ फक्त बंदिश चग्गर यांच्या गळ्यात पडली आहे.
> यंदा संसदेत पोहोचलेल्या 20 पंजाबी खासदारांमध्ये 18 खासदार हे लिबरल पक्षाचे आहेत. त्यापैकी 16 भारतीय वंशाचे पंजाबी आहेत.

कोण आहे कॅनडाचे संरक्षण मंत्री?
> होशियारपूर येथील रहिवासी हरजीत सज्जन हे वँकूवर येथून निवडून आले आहेत.
> कॅनडाच्या लष्करात हरजीत सज्जन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे.
> हरजीत सज्जन यांनी वँकुवर पोलिस दलात 11 वर्षे नोकरी केली. गँग क्राइम यूनिटमध्ये डिटेक्टरचे काम पाहिले.
> हरजीत सज्जन यांनी तालिबानी व बोसनियामध्ये दोनदा विशेष सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
> संरक्षण मंत्री बनल्यानंतर हरजीत सज्जन यांची जबाबदारी वाढली आहे. इराकमधील कॅनडाच्या लष्कराचे ऑपरेशन संपुष्ठात आणण्याचा मुद्दा प्रचारात आला होता.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कॅनडा सरकारमधील भारतीय वंशाच्या मंत्र्यांचे फोटोज...