आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांनी तयार केले अनोखे ग्लोव्हज, हजारो किमी दूर असूनही परस्परांना स्पर्श केल्याची होईल जाणीव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टोरंटो - एखाद्या व्यक्तीपासून हजारो किमी दूर असलात तरी त्या व्यक्तीला स्पर्श केल्याची जाणीव आता तुम्हाला होऊ शकेल. यासाठी कॅनडातील एका विद्यापीठात शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी सहायक प्राध्यापक कॅमरन न्यूटेडर यांच्या मदतीने अनोखे हँड ग्लोव्हज तयार केले आहेत. सिमॉन फ्रेजर विद्यापीठाच्या या चमूने ग्लोव्हजचे नाव ‘फ्लेक्स अँड फील’ असे ठेवले आहे.

कॅमरन म्हणाले, ‘आपले करिअर घडवण्यासाठी अनेक लोक आई-वडील व जोडीदारांपासून दूर राहतात. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून ते भेटतात. मात्र, शरीररूपाने ते जवळ येऊ शकत नाहीत किंवा स्पर्श करू शकत नाहीत. यासाठी हे ग्लोव्हज तयार करण्यात आले आहेत. या माध्यमातून परस्परांना स्पर्श केल्याची जाणीव होऊ शकेल.’

हे ग्लोव्हज कसे काम करतात, असे विचारले तेव्हा कॅमरन म्हणाले, ‘ग्लोव्हजमध्ये एक छोटे बटण आहे. एखाद्याने हे बटण दाबून ग्लोव्हजमध्ये हात घातला आिण हालचाल केली तर लहरी बाहेर पडतील. या लहरी दुसऱ्या व्यक्तीजवळ असलेल्या ग्लोव्हजपर्यंत जातील.
 
‘बी विथ मी’ नजरेने एकमेकांना पाहा...
याच विद्यापीठातील संशोधकांचे दुसरे पथक अाभासी वास्तव अर्थात व्हर्च्युअल रिअॅलिटीवर काम करत आहे. कॅमरन यांच्या नेतृत्वाखाली हा चमू व्हर्च्युअल रिअॅलिटी कॉन्फरन्सिंग सिस्टिम तयार करत आहे. या माध्यमातून आपण दूरवर आपले आप्तेष्ट जे पाहत असतील त्याच गोष्टी पाहू शकाल. ‘बी विथ मी’ असे या प्रकल्पाचे नाव आहे. या प्रकल्पाचे काम सध्या अत्यंत प्राथमिक टप्प्यात असल्याचे कॅमरन म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...