ईगन (अमेरिका) - मिनेसोटा प्रांतातील ईगन शहरात एक भोजनाचा ट्रक चर्चेला विषय ठरला आहे. चर्च, रुग्णालय, बेघर आणि पोलिस स्थानकांतील लोकांना त्यांच्या पसंतीचे भोजन त्यातून पुरवले जाते. ट्रकला कर्करोग पीडित १२ वर्षीय ल्युकसच्या नावावरून ‘शेफल्युकासफूड’ असे नाव देण्यात आले आहे. अन्नदानाचा हा ट्रक ल्युकसच्या इच्छेवरून भ्रमंती करू लागला आहे. लोकांना मनपसंत पदार्थ खाऊ घालावे, अशी त्याची इच्छा होती. ‘मेक माय विश’ संस्थेला त्याची इच्छा कळवण्यात आली. तेव्हा संस्थेने चिमुरड्याचे स्वप्न पूर्ण केले. विशेष म्हणजे ल्युकस लोकांमध्ये सहभागी होतो. त्यांच्या आवडीचे पदार्थ त्यांना सर्व्ह करतो.
पुढे पाहा, संबंधित छायाचित्र...