आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Captain Of The Ship Which Victimize 900 Is Arrested

900 प्रवाशांचे बळी घेणा-या जहाजाच्या कप्तानास अटक, मृतदेह काढणे सुरुच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कटानिया (इटली) - लिबिया समुद्र किना-याजवळ उलटलेल्या जहाजाचा कप्तान व क्रू सदस्यांना अटक करण्यात आली आहेे. लिबियातील अस्थिर परिस्थितीमुळे हे नागरिक अवैध मार्गाने युरोपात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात होते. जहाज उलटल्याने ९०० प्रवाशांना जलसमाधी मिळाल्याचा अंदाज इटलीच्या तटरक्षक दलाने वर्तवला आहे. समुद्रातून मृतदेह काढण्याची मोहीम अद्यापही सुरूच आहे. ग्रीसच्या समुद्र किना-यावरही बचाव पथक काम करत आहे.

जहाजाचा ट्युनेशियन कप्तान व सिरियन क्रू सदस्यांना ताब्यात घेतल्याचे सहायक लवाद रॉक्को लिगौरी यांनी सांगितले. सिसिली बेटावर या सदस्यांना ताब्यात घेण्यात आले. युरोपात घुसखोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्यांच्यावर खटला भरण्यात आला आहे. कप्तानावर बेजबाबदार वर्तनाचा खटला भरण्यात आला आहे. दरम्यान, लिबिया किना-यावरून अशी जहाजे रोखण्यासाठी धडक कृती करण्याची मागणी इटलीचे पंतप्रधान मात्तेआे रेनझी यांनी युरोपियन युनियनकडे केली आहे. येथील ९० टक्के विस्थापित इटलीच्या दिशेने येतात.
गुरुवारी ब्रुसेल्स येथे बैठक
युरोपियन देश सागरी मार्गाने होणा-या घुसखोरीच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी येत्या गुरुवारी ब्रुसेल्स येथे एकत्रित येणार आहेत. यावर १० कलमी उपाययोजना आखण्यात येणार असल्याचे युरोपियन युनियनच्या परराष्ट्र धोरणप्रमुख फ्रेडरिका मोघेरिनी यांनी सांगितले. दरम्यान, जहाजाच्या डेकखाली असणारे शेकडो प्रवासी स्वत:ची सुटका करू शकले नाहीत, असे इटलीच्या बचाव पथकाने म्हटले आहे.