एका सुरक्षा अधिकार्याने सांगितले की, विदेशी ताफ्यातील दोन कारला टार्गेट करून स्फोट घडवून आणला आहे. विदेशी ताफ्यात कोण सहभागी झाले होते, या संदर्भात माहिती मिळू शकली नाही.
दरम्यान, गेल्या आठवड्यात शुक्रवारी काबूल तीन साखळी बॉम्बस्फोटाने हादरले होते. या स्फोटात 35 जणांचा मृत्यू झाला होता तर शेकडो लोक जखमी झाले होते. पोलिस अकादमीबाहेर शुक्रवारी आत्मघातकी हल्ला झाला होता. त्यात 20 प्रशिक्षणार्थी पोलिसांचा मृत्यु झाला होता. दुसरीकडे, शाह शाहिद येथील आर्मीच्या चौकीवर स्फोटकांनी भरलेला एक ट्रक घुसला होता. या स्फोटात 15 जण ठार झाले होते.
काबुलमध्ये प्रत्येक दिवशी रोकले जातात किमान 10 हल्ले...
अफगाणिस्तानत असलेले नाटोचे जनरल जॉन कॅंबेल यांनी सांगितले की, काबुल एअरपोर्टजवळ शक्तीशाली स्फोट झाला आहे. स्फोटात शेकडो लोकांचा मृत्यु झाल्याचे वृत्त आहे. काबुलमधील स्थिती दिवसेंदिवस भयंकर होत आहे. प्रत्येक दिवशी किमान 10 हल्ले थांबवले जातात. असे असतानाही मागील सहा महिन्यांत काबुलमध्ये झालेल्या अनेक स्फोटात 1200 हून जास्त लोकांचा मृत्यु झाला आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, शक्तीशाली स्फोटाची छायाचित्रे...