आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुर्की : BMWमधून आलेल्या महिलेने बसस्टॉपवर घडवला स्फोट, 34 ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्फोटाची तीव्रता एवढी होती, की एका चालत्या बसमधील 20 जण जागेवर ठार झाले - Divya Marathi
स्फोटाची तीव्रता एवढी होती, की एका चालत्या बसमधील 20 जण जागेवर ठार झाले
अंकारा - तुर्कीची राजधानी एका महिन्यात दुसऱ्यांदा बॉम्ब ब्लास्टने हदरली आहे.रविवारी अंकारामध्ये झालेल्या स्फोटात 34 जण ठार झाले, तर 125 जखमी आहेत. हल्लेखोरांमध्ये एक महिला होती. स्फोटकांनी भरलेली बीएमडब्ल्यू बसस्टॉपवर आली आणि स्फोट झाला. स्फोट एवढा शक्तीशाली होता, की बसमधील 40 पैकी 20 जण जागेवरच ठार झाले.
कुठे झाला हल्ला, कोणावर आहे शंका
- स्थानिक वेळेनूसार स्फोट रविवारी सायंकाळी 6 वाजून 43 मिनिटांनी सेंट्रल गुवेन पार्क आणि किजले स्केअरच्या जवळ झाला.
- कार बॉम्बचा आवाज कित्येक किलोमीटरपर्यंत ऐकायला आला. स्फोटानंतर आसपासच्या 200 मीटर परिसरातील गाड्यांनी पेट घेतला होता.
- अशी माहिती आहे, की हल्ल्यामागे कुर्दीस्थान वर्कर्स पार्टी आहे. 30 वर्षांपासून त्यांचा येथे हिंसाचार सुरु आहे.
- ज्या ठिकाणी स्फोट झाला तेथून जवळच न्यायाधिश, मंत्री आणि माजी पंतप्रधानांचे निवासस्थान आहे.
- तुर्कीचे राष्ट्रपती तैयप इरडोगन म्हणाले, या हल्ल्यांनी आमच्या देशाच्या एकतेला धोका निर्माण होत आहे, मात्र दहशतवादाविरुद्धची लढाई आम्ही सैल करणार नाही.
पुढील स्लाइ़डमध्ये पाहा, हल्ल्यानंतरचे किजले स्केअरचे दृष्य
बातम्या आणखी आहेत...