आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएसचा बगदादमध्ये कार बॉम्बस्फोट; ३० ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद- इराकच्या दियाला प्रांतात बुधवारी झालेल्या कार बॉम्बस्फोटात किमान ३० जण ठार झाले. इस्लामिक स्टेट या दहशतवादी गटाने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. ही घटना राजधानीच्या पूर्वेकडील बगदाद अल-जादिदा जिल्ह्यात घडली.

बगदाद अल-जादिदा जिल्ह्यातील स्फोटाचा परिसर हा शिया समुदायबहुल मानला जातो. या भागात सातत्याने कार बॉम्बस्फोट घडतात. मंगळवारी बाजारपेठेत झालेल्या स्फोटात १९ जण ठार, तर ४३ जखमी झाले होते. दुसरीकडे दक्षिणेकडील झाफारानिया प्रांतात झालेल्या स्फोटाच्या घटनेत चार ठार, तर १० जण जखमी झाले होते. मंगळवार आणि बुधवारी झालेल्या स्फोटाची जबाबदारी इस्लामिक स्टेटने घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच खान बनी साद शहरात असाच स्फोट झाला होता.
स्फोटात १५ ठार

मझर-ए-शरीफ- उत्तर अफगाणिस्तानमध्ये बुधवारी झालेल्या आत्मघाती हल्ल्यात किमान १५ जण ठार झाले. तुर्कमेनिस्तानच्या सरहद्दीजवळील अलमार जिल्ह्यात बाजारपेठेत ही घटना घडली. हल्ल्याची जबाबदारी मात्र अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. स्फोटकांनी भरलेले वाहन घेऊन आलेले आत्मघाती हल्लेखोरांचे वय २० ते २५ दरम्यान आहे.