आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खालिदा झियांवर भ्रष्टाचाराचा खटला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका - बांगलादेशच्या माजी पंतप्रधान विरोधी पक्षनेत्या बेगम खालिदा झिया यांच्यावर आता भ्रष्टाचाराचा खटला चालणार आहे. त्यांना दोन महिन्यांच्या आत कनिष्ठ न्यायालयात शरणागती पत्करावी लागणार आहे. या निकालाच्या प्रती विशेष न्यायाधीशांकडे पाेहोचताच ही मुदत सुरू होईल. ढाकाच्या उच्च न्यायालयाने झिया यांची याचिका फेटाळत बुधवारी हा निकाल दिला.

२००७ मधील भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी झिया यांच्यावर हा खटला दाखल करण्यात आला आहे. त्यांनी हा खटला फेटाळण्याची मागणी केली होती. दरम्यान, न्यायालयाने २००७ मध्ये खालिदा झिया यांना दिलेला जामीन तसेच सुनावणीवर २००८ मध्ये लावलेले प्रतिबंध हटवले आहेत. सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात कोणीही न्यायालयाच्या प्रक्रियेला आव्हान देऊ शकत नाही. मात्र, खालिदा यांचे वकील खांडकर महबूब हुसैन यांनी उच्च न्यायालयाच्या निकालास आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे. खालिदा यांनी झिया अनाथालय ट्रस्ट आणि झिया धर्मदाय ट्रस्टमध्ये हेराफेरी करत हा भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे.