Home »International »Other Country» Catholic Priest Of Indian Heritage Stabbed In Australia

ऑस्ट्रेलियात भारतीय वंशाच्या फादरचा गळा कापला, हल्लेखोर म्हणाला- सुशिक्षित नव्हते

दिव्य मराठी वेब टीम | Mar 20, 2017, 11:46 AM IST

  • मेलबर्नमध्ये भारतीयवंशाचे पादरी टॉमी कलाथूर मैथ्यू (48) यांचा चर्चमध्येच गला कापण्यात आला. (प्रतिकात्मक)
मेलबर्न - येथे एका भारतीय वंशाचे पादरी टॉमी कलाथूर मॅथ्यू (48) यांचा चर्चमध्येच गळा कापण्यात आला आहे. हा वर्णद्वेषी हल्ला असल्याचे मानले जात आहे. हल्लेखोराने त्यानंतर म्हटले की, ते शिकलेने नव्हते. एका 72 वर्षीय व्यक्तीला ठरवून हल्ला केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला जामीनही देण्यात आला.

तुम्ही भारतीय आहात, हिंदु किंवा मुस्लीम असायला पाहिजे
- स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, हल्लेखोर पादरीला म्हणाला की, ते भारतीय आहेत. त्यामुळे तुम्ही हिंदु किंवा मुस्लीम असायला हवे. त्यानंतर तो लोकांना म्हणाला, ते अशिक्षित होते.
- असे सांगितले जात आहे की, हल्लेखोर रविवारी चाकू घेऊन फॉकनर येथील सेंट मॅथ्यूज चर्चमध्ये गेला.
- चर्चमध्ये येणारी एक महिला मेलिनाच्या मते, चर्चच्या मागच्या भागात मोठ मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला. त्यानंतर मी पाहिले कीस फादर टॉमी हात हलवून मला बोलवत होते.
- त्यांनी मला गळा दाखवला आणि गळा कापला असल्याचे सांगितले.
- सध्या टॉमी यांच्या शरिरावर काही ठिकाणी जखमा आहेत. ते हॉस्टिपलमध्ये अॅडमिट आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे.

काय म्हणाले पोलिस
- सिनियर कॉन्स्टेबल रायनन नॉर्टन यांच्या मते, ही घटना काहीशी वेगळी असल्याचे पोलिसांना वाटत आहे.
- तो इतर कुणासाठी धोका ठरू शकतो असे आम्हाला वाटत नाही.
- मेलबर्नमध्ये कॅथलिक चर्चचे प्रवक्ते शेन हिली यांनी घटना भितीदायक असल्याचे म्हटले आहे.
- शेन यांच्या मते, कोणत्याही व्यक्तीला अशा प्रकारची वागणूक देता कामा नये. टॉमी लोकांसाठी चांगले काम करत आहेत. ते कॅथलिक पादरींना प्रेरणा देणारे आहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended