आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cats Meat Served Illegally In Vietnamese Restaurants

मांजरीच्या मांसाची मागणी, बंदी असूनही व्हिएतमानमध्‍ये मारला जातो ताव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हनोई - व्हिएतनाममध्‍ये मांजरींचे अस्तित्व धोक्यात आले आहे.येथे त्यांच्या मांसाची मागणी मोठी असून ती पूर्ण करण्‍यासाठी दररोज मोठ्या संख्‍येने मांजरींची हत्या केली जात आहे.रेस्तरॉंमध्‍ये पाळीव मांजरींचे मांस 'बेबी टायगर'या नावाने विकले जाते. मात्र व्हिएतनाममध्‍ये त्याचे मांस सेवन करणे नियमाविरुध्‍द मानले जाते.क्यू बि‍यो रेस्तरॉंचे मालक सांगतात,की मांजरींचे मांसाला खूप मागणी आहे.एका दिवशी तर मांसाची मागणी पूर्ण करण्‍यासाठी त्यांनी 31 मांजरी कापाव्या लागल्या होत्या.क्यू बियोमध्‍ये रोज मांजरींचे मांस शिजवले जाते. कॅट म‍िट हॉट पॉट (प्रति प्लेट 3 हजार 720 रु.)आणि कॅट मिट नूडल्स(२८० रुपये प्रति वाटी)ही रेस्तरॉंचे प्रसिध्‍द डिश आहे.

हनोईचा एक अन्य रेस्तरॉं मालक नाव उघड न करण्‍याच्या अटीवर सांगितले, की मोठ्याप्रमाणावर ग्राहक मांजरीच्या मांसाची मागणी करतात. इतर कोणत्याही मांसाच्या तुलनेत ते खूप स्वादिष्‍ट आणि आरोग्यदायी आहे.व्हिएतनाममध्‍ये मांजरींच्या मांस खाण्‍यावर बंदी आहे. 1997 मध्‍ये पूर्व पंतप्रधान फान वान खाई यांनी बंदी घातले होते. परंतु येथे सर्वात जास्त खरेदीदार पोलिस अधिकारी,आर्मी ऑफीसर आणि वकीलसह इतर मोठ्या पदावरील लोकांचा समावेश आहे.

अॅनिमल वेल्फेअर ग्रुप्समध्‍ये नाराजी
अॅनिमल वेल्फेअर ग्रुप्समध्‍ये व्हिएतनाममध्‍ये चालू असलेल्या बेकायदेशीर व्यापारावर नाराज आहेत.मांसाची मागणी पूर्ण करण्‍यासाठी जनावरांना निर्दयीपध्‍दतीने दूर नेले जाते. शेजारी देश चीन आणि लाओसमधून ट्रक्समध्ये व्हिएतनामात आणले जाते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, व्हिएतनाममधील मांजरीच्या मांस विक्री करणा-या रेस्तरॉंचे फोटोज...