लास वेगास - फ्लॉयड मेयवेदर आणि मॅनी पाखयाऊ यांच्यात झालेला बॉक्सिंगचा महामुकाबला पाहण्यासाठी हॉलीवूडच्या अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी हजेरी लावली. लास वेगासच्या एमजीएम ग्रँड अरीना येथे झालेला हा मुकाबला पाहण्यासाठी 16500 हून अधिक लोक उपस्थित होते. पाखयाऊ याच्या विरोधात 112 विरुद्ध 116 गुणांनी मेयवेदरने हा सामना जिंकला. यावेळी जगातील सर्वात श्रीमंत बॉक्सर मेयवेदर म्हणाला की, मी लवकरच निवृत्ती घेणार आहे. पण त्याआधी मी एक मॅच खेळेल. सप्टेंबरमध्ये निवृत्त होणाऱ्या मेयवेदरचा अखेरचा सामना कोणाबरोबर होणार हे मात्र अद्याप स्पष्ट नाही. जस्टिन बीबर, बियॉन्स, जे जेड, पॅरिस हिल्टन असे सेलिब्रिटी यावेळी उपस्थित होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, फाइट पाहण्यासाठी आलेले सेलिब्रिटी...