आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celebrations Of Fake Weddings, Guests Have To Pay For It

खोट्या लग्नांमध्ये शोधताहेत खरा आनंद, पाहुण्यांना मात्र मोजावी लागते Fees

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खोट्या लग्नासाठी तयार झालेली नवरी. - Divya Marathi
खोट्या लग्नासाठी तयार झालेली नवरी.
ब्यूनस आयर्स - अर्जेंटिनामधील तरुणांनी लग्नसोहळ्याचा आनंद लुटण्यासाठी एक विचित्र उपाय शोधून काढला आहे. हे लोक खोट्या लग्नाची थीम तयार करतात. हे पाहायला अगदी खऱ्या लग्नांसारखे असतात. सुमारे 600-700 लोक एकत्र जमतात आणि लग्नाच्या संपूर्ण विधी करतात. पार्टी होते, नाचणे गाणेही सुरू असते. नवरदेव, नवरी आणि लग्न लावणारे धर्मगुरूही असतात. फक्त कमतरता असते ती खऱ्या लग्नाची. सोबतच पाहुण्यांना सोहळ्याचा आनंद घेता यावा म्हणून 3200 रुपये फीस द्यावी लागते. त्यात नवरदेव-नवरी बनण्यासाठी एखाद्या कपलला पैसे देऊन बोलावले जाते.

कोणी केली सुरुवात...
26 वर्षांचा मार्टिन अॅक्रेबीने येथे सर्वात आधी अशी फेक लग्नाची पार्टी दिली होती. दोन वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या चार मित्रांबरोबर ला प्लातामध्ये असा इव्हेंट आयोजित केला होता. त्या सर्वांचे म्हणणे होते की, लग्नासारखे नाते संपूर्ण आयुष्यासाठी सांभाळणे त्यांना शक्य नाही. पण त्याच्या अानंदापासूनही त्यांना अलिप्त राहणे शक्य नसते. त्यानंतर त्यांनी असा प्रकारच्या पार्टीचा व्यवसाय करण्याचा विचार केला. त्यानंतर त्यांनी फाल्सा बोडा नावाने एक फेक वेडिंग एजन्सी तयार करण्यात आली. त्यांनी आतापर्यंत 10 पेक्षा जास्त बनावट पार्टी आयोजित केल्या आहेत.

असा असतो इव्हेंट..
म्हणायला हा विवाह खोटा असतो. पण सोहळ्याचा आनंद घेता यावा म्हणून आयोजन करण्यात आलेली प्रत्येक बाब ही खरी असते. नवरदेव नवरीपासून ते व-हाडी मंडळींपर्यंत सगळे महागडे कपडे परिधान करून असतात. विवाहासाठी महागडे लोकेशन निवडले जाते. खाणे, पिणे, डीजे सर्वकाही आलिशान असते. पण हा सोहळा संपल्यानंतर मात्र लगेचच या सर्वांना जेकाही घडले ते सर्व खोटे होते याची जाणीव करून दिली जाते. मनोरंजनासाठी सोहळ्यामध्ये काही नाट्यमय घडामोडीही घडत असतात.

यामुळे मिळतेय प्रसिद्धी
सरकारी आकडेवारीनुसार ब्यूनस आयरसमध्ये 1990 मध्ये 22 जोडप्यांनी विवाह केला होता. हा आकडा आता 11 हजार 642 वर आला आहे. लग्न करणारे बहुतांश लोक जास्त वयाचे असतात. त्यामुळे ते इव्हेंट आयोजित करू शकत नाहीत. त्यामुळेच येथे लोकांना लग्नांमध्ये जाण्याची संधी मिळत नसल्याने अशा प्रकारचे खोटे लग्न आयोजित करण्यात येते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS