अबू धाबी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सन्मानार्थ अबू धाबीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या डीनरसाठी प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांची विशेष उपस्थिती होती. अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी (ADIA) द्वारे डीनर आयोजित करण्यात आले होते. अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी या देशाच्या 800 अब्ज डॉलर (5053600 कोटी रु) या संपत्तीवर नियंत्रण ठेवते.
कोणी दिले स्पेशल डिनर?
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी ट्विटद्वारे सांगितले होते की, या उच्चस्तरीय डीनरदरम्यान इनव्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीजवर चर्चा करण्यात आली. अबू धाबी इनव्हेस्टमेंट अथॉरिटीचे मॅनेजिंग डायरेक्टर हामीद बिन झायेद अल नाहयान यांनी डिनर होस्ट केले होते. त्यांनी सांगितले की, खास पंतप्रधानांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या डिनरमध्ये स्पेशल शाकाहारी मेन्यूसाठी स्टार शेफ संजीव कपूर यांना यूएईला बोलावण्यात आले होते.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS