आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असिस्टंट समजून कोणी हस्तांदोलनही केले नाही म्हणून सीईओ होऊन आता महिलांना देतात जबाबदारीची पदे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - झेन सन चिनी ट्रॅव्हल कंपनी सिट्रिपच्या सीईओ आहेत. कंपनीतील बहुतांश महत्त्वाच्या पदावर त्या महिलांची नियुक्ती करतात. महिलांना मोठी जबाबदारी देऊनही यशस्वी होता येते हे त्यांना जगाला दाखवून द्यावयाचे आहे. मात्र, झेन यांची खरे तर पूर्वी अशी धारणा नव्हती. काही वर्षांपूर्वीचा एक प्रसंग त्यासाठी कारणीभूत ठरला. महिला मोठी जबाबदारी पार पाडू शकत नसल्याचे आजही अनेकांना वाटते. बाजार भांडवल मूल्यात सिट्रिप जगातील दुसरी मोठी ऑनलाइन ट्रॅव्हल कंपनी आहे.

४८ वर्षीय झेन गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये सीईओ झाल्या. त्या म्हणाल्या, काही वर्षांपूर्वी एका बैठकीसाठी कंपनीच्या संचालक मंडळाच्या दोन सदस्यांसमवेत टोकियोला गेले होते. दोघे पुरुष होते. तिथे गेल्यावर केवळ पुुरुषांचेच स्वागत करण्यात आले. सर्वांनी दोघांची ओळख करून घेतली. मला सहायकासारखी वागणूक मिळाली. तेव्हा तर मी कंपनीची मुख्य वित्त अधिकारी होते. मात्र, माझ्याशी कोणीही हस्तांदोलन केले नाही. ही बाब मनाला लागली. यानंतर जास्तीत जास्त महिलांनाच जबाबदारीची पदे देण्याचे मी ठरवले. सध्या कंपनीचे धोरण, वित्त, इन्व्हेस्टर रिलेशन्स, ऑपरेशन्स सर्व विभागाच्या प्रमुख महिला आहेत.

अशी वागणूक पुन्हा मिळाली का? या प्रश्नावर झेन म्हणाल्या, आजही अनेकांचा प्रतिसाद पाहिल्यावर माझे महत्त्व पुरुषांपेक्षा कमी असल्याची जाणीव होते. याबाबतीत अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीपासून चीनमध्ये बीजिंगपर्यंत मी एकसारखी मानसिकता पाहिली आहे. माझे वडील केमिकल इंजिनिअर होते आणि भाऊ फिजिसिस्ट. त्यांचे प्रयोगशाळेतील काम पाहून आमचा देश खूप महान होईल,असे वाटत होते. मात्र, बदलासाठी अधिक प्रयत्न हवे असे वाटले. 
 
महिलांनी निर्धास्तपणे काम करावे यासाठी डे-केअर सेंटर
जेन यांनी कार्यालय वुमेन फ्रेंडली करण्याचा प्रयत्न केला. लहान मुले असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी निर्धास्तपणे काम करावे यासाठी कार्यालयाजवळ डे-केअर सेंटर सुरू केले. जेन म्हणाल्या, महिला असल्यामुळे आमच्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत. आम्हाला जास्तीचे लाभ दिले जातात तेव्हा अपेक्षाही तेवढ्याच वाढतात.
बातम्या आणखी आहेत...