आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमान दुर्घटना टाळायची? मग लग्न झटपट उरका, सीईओचा वैमानिकांना अनोखा सल्ला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंकारा - ‘माझ्या वैमानिक मित्रांनो’ तुम्ही महिला असा किंवा पुरुष. तुमची जीवनशैली खूप महत्त्वाची आहे. म्हणूनच मी अविवाहित असणा-या समस्त तरुण वैमानिकांना झटपट लग्न उरकून टाका, असा सल्ला देतो. कारण विवाहित लोक अविवाहितांच्या तुलनेत कमी तणावग्रस्त असतात. हे आवाहन तुर्की एअरलाइन्सचे सीईआे तेमेल कोटिल यांनी केले आहे.

चार मुलांचे वडील कोटिल २००५ पासून एअरलाइन्समध्ये सीईआे आहेत. ते एका कार्यक्रमात आपल्या नवीन कर्मचा-यांशी बोलत होते. बोलताना जर्मनविंग्ज विमान दुर्घटनेचा उल्लेख आला. ही घटना २४ मार्च रोजी घडली होती. त्यात सर्व १५० प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
जर्मनविंग्ज विमानातील सहवैमानिक आंद्रे लुबित्ज प्रेमिकेच्या नाराजीमुळे खूप हताश होता, ही माहिती दुर्घटनेच्या तपासात पुढे आली आहे. हतबल असल्यामुळे वैमानिक कॅप्टन काॅकपिटच्या बाहेर पडताच त्याने कॉकपिटचा दरवाजा आतून बंद केला आणि विमानाला फ्रान्सच्या डोंगराळ भागात धडकवले. लुबित्जच्या प्रेमिकेने त्याची दोन महागड्या कारची भेटही स्वीकारण्यास नकार दिला होता.

...पण विवाहदेखील मोडतात ना
विवाहित असणे हा काही तणाव कमी करण्याचा खात्रीलायक फॉर्म्युला नाही. कारण घटस्फोटासारखी स्थितीदेखील तणाव आणि नैराश्याचे कारण ठरू शकते. एका पाहणीनुसार वेगवेगळ्या पेशात वावरणा-यांची वैवाहित स्थिती अशी आहे.

जर्मनविंग्ज विमान दुर्घटनेतून बोध
फ्रान्समध्ये झालेल्या जर्मनविंग्जच्या दुर्घटनेतून आपल्याला चांगलाच धडा मिळाला आहे. सहवैमानिक लुबित्जच्या प्रेमिकेने त्यास सोडून दिले होते. म्हणून ही घटना घडली होती. त्यामुळेच या व्यासपीठावरून मी सर्वांना विवाह करा, असा सल्ला देतो...वैमानिकाची नोकरी खूप गुंतांगुतीची असते, ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे. त्यासाठीच प्रवासी विमानाचे परिचालन करणा-या वैमानिकांनी तणावापासून दूर राहिले पाहिजे. वैवाहिक जबाबदा-या अशा तणावापासून दूर ठेवण्याचे काम करतात.