आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाबहार पोर्टच्या पहिल्या टप्प्याचे इराणी राष्ट्राध्यक्षांच्या हस्ते उद्घाटन, भारताच्या मदतीने तयार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेहराण - इराणमध्ये चाबहार पोर्टच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन राष्ट्राध्यक्ष हसन रोहाणी यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले आहे. या प्रसंगी भारत आणि अफगाणिस्तानचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते. इराणच्या दक्षिण पूर्व सिस्तान, बलुचिस्तान प्रांतातून निघणाऱ्या या पोर्टने भारत, इराण आणि अफगाणिस्तानसाठी व्यापाराचे नवे मार्ग खुले होणार आहे. या स्ट्रॅटेजिक रूटला तिन्ही देशांच्या मैत्रिचे आणि औद्योगिक संबंधांचे प्रतिक देखील मानले जात आहे. 

 

भारताला फायदा कसा?
>> या पोर्टने भारताला इराण आणि अफगाणिस्तानला पोहोचण्यासाठी किंवा व्यापार करण्यासाठी पाकिस्तानमार्गे जाण्याची काहीच गरज पडणार नाही.
>> एकदा हा पोर्ट पूर्णपणे विकसित झाल्यास भारताला पाकिस्तानला डिच करत थेट इराण, अफगाणिस्तान आणि युरोप गाठता येणार आहे. 
>> चाबहार पोर्टला भारत, इराण आणि अफगाणिस्तानमध्ये नवीन धोरणात्मक रूट मानले जात आहे. तिन्ही देशांच्या मैत्री आणि द्विपक्षीय संबंधांचे हे प्रतिक असणार आहे. 
>> या पोर्टच्या माध्यमातून तिन्ही देश एकमेकांशी थेट व्यापार आणि दळणवळण करू शकतील. त्यामुळे, तिन्ही देशांतील उद्योगांना चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

 

सुषमांनी इराणी परराष्ट्र मंत्र्यांशी केली चर्चा
- चाबहार प्रोजेक्टच्या पहिल्या टप्प्याला शहिद बेहेष्टी पोर्ट असे म्हटले जाते. 
- या उद्घाटनाबद्दल परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आपले इराणी समकक्ष जावेद झरीफ यांच्याशी चर्चा केली. 
- सुषमा स्वराज सध्या रशियाच्या सोची शहरातून तेहराणला पोहोचल्या आहेत. त्या शांघाय कॉर्पोरेशनच्या वार्षिक संमेलनासाठी रशियात गेल्या होत्या. 

बातम्या आणखी आहेत...