आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंध्रची नवीन राजधानी ‘मेड बाय चायना’, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू चीन दौ-यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - भारतातील बाजारपेठेत ‘मेड इन चायना’ वस्तूंची नुसती स्पर्धा दिसते. आता तर एका राज्याची राजधानीच मेड बाय चायना झाली तर आश्चर्य वाटायला नको. कारण आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू राज्याची नवीन राजधानी तयार व्हावी म्हणून गुंतवणुकीची व्यवस्था करण्यासाठी चीनमध्ये दाखल झाले आहेत.

आंध्र प्रदेशच्या विभाजनाबरोबरच तेलंगणाला राजधानी म्हणून हैदराबाद मिळाले आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशला नवीन राजधानीचा शोध आहे. त्याचाच एक भाग म्हणून नायडू शिष्टमंडळासह चीनमध्ये आहेत. सोबत राज्यातील अनेक बडे उद्योगपती आहेत. नायडू चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या इंटरनॅशनल विंगच्या निमंत्रणावरून येथे एक आठवड्याच्या दौऱ्यावर आले आहेत. ते चीनमधील मोठ्या उद्योगपतींसोबत चर्चा करतील. एक बैठक तर ‘आंध्र प्रदेशमध्ये गुंतवणुकीची शक्यता’ याच विषयावर आहे. त्यात देशातील प्रमुख गुंतवणूकदार सहभागी होतील. तैवानची प्रमुख इलेक्ट्रॉनिक फर्म फॉक्सकॉनचे वरिष्ठ अधिकारीही त्यात असतील. ही फर्म अॅपल, सॅमसंग, डेल, शाआेमी इत्यादींसाठी सुटे भाग तयार करण्याचे काम करते. शाआेमीचे स्मार्टफोन भारतात वादळासारखे आले आहेत. भारताच्या राजदूत कार्यालयातील अधिकारी नायडू यांच्या चर्चेचे नियोजन करत आहेत. त्यात आंध्र प्रदेशची नवी राजधानी बनवणे आणि मोठ्या पातळीवर इतर विकास प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यामुळे मीडियाचे लक्ष वेधले गेले आहे.

येथे आणणार गुंतवणूक
रस्ते बांधकाम, अपारंपरिक ऊर्जा, मेट्रो, ऑटो, आॅटो उपकरणे, अवजड यंत्रे आणि उपकरणे, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मा, व्हाइट गुड्स, कचरा व्यवस्थापन इत्यादी.